ETV Bharat / state

Aaditya Thackeray Criticize CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे फक्त एटीएम म्हणून पाहतात, आदित्य ठाकरेंची टीका - Chief Minister Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईशी काहीही संबंध नसून त्यांना मुंबईचा वापर फक्त एटीएम म्हणून करायचा आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jan 13, 2023, 8:09 PM IST

मुंबई - मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील चारशे किलोमीटरच्या रस्त्यांचे सरसकट कॉंक्रिटीकरण केलं जाणार असल्याची घोषणा करून टाकली होती. मात्र, एवढं मोठं काम एक सोबत करता येऊ शकते का याची साधी कल्पनाही मुख्यमंत्र्यांना नाही असा, चिमटा आहे आदित्य ठाकरे यांनी काढला. चारशे किलोमीटरच्या रस्त्यांसाठी साडेसहा हजार कोटींचं टेंडर महापालिकेकडून काढण्यात आले आहे. याआधी काढलेले टेंडर कोणत्याही कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे रद्द करावा लागले होते.

कामात मोठा घोटाळा - मात्र पुन्हा एकदा 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामाच्या टेंडर काढले असून यामध्ये मोठा घोटाळा असल्यापासून संशय आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. चारशे किलोमीटर रस्त्याचं काम एक सोबत करणे हे शक्य नाही. कारण कोणत्याही रस्त्याचा काम करण्यासाठी जवळपास 42 युटिलिटी, 16 वेगवेगळ्या विभागांच्या परवानगी घ्याव्या लागतात. त्यामुळे एक सोबत चारशे किलोमीटर रस्त्याचे काम सुरू केल्यास संपूर्ण मुंबई ठप्प होईल अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुंबईकरांना नाहक त्रास - रस्त्यांची कामे हे नेहमीच ऑक्टोबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत या कालावधीतच करावी लागतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता घोषणा करून जर ही मुंबईतील रस्त्यांची कामे करायला घेतल्यास त्याचा नाहक त्रास मुंबईकरांना होणार असल्याचा आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना भवन येथे पत्रकार पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी हा संशय व्यक्त केला.

"शेड्युल ऑफ द रेट" बदलले - महानगरपालिकेकडून कोणत्याही कामाचे टेंडर काढत असताना शेड्युल ऑफ द रेट प्रमाणे काढले जाते. यानुसार कामाच्या 20% कमी किंमत देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिले जाते. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या या कामाबाबत कामाच्या जवळपास 20 टक्के अधिक रकमेत कंपन्यांना कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे वाढीव 20 टक्के रकमेने काम दिल्यामुळे एकूण रकमेच्या चाळीस टक्के अधिकची रक्कम कॉन्ट्रॅक्टर ना या कामासाठी द्यावी लागणार आहे.

महानगरपालिकेला बारा टक्के जीएसटी - तसेच या कामासाठी लागणाऱ्या रकमेवरचा बारा टक्के जीएसटी देखील महानगरपालिकेला भरावा लागणार आहे. त्यामुळे या कामांचा मोठा आर्थिक फटका महानगरपालिकेला बसेल. मुख्यमंत्री, राज्य सरकार मुंबईला केवळ एटीएम म्हणून पहात आहेत. साडेसहा हजार कोटींच्या कामांमुळे मुंबईची कोंडी झाल्यास मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या असलेल्या ठेवी देखील तोडाव्या लागतील. या ठेवी मोडल्यास इतर महानगरपालिकेत प्रमाणे मुंबई महानगरपालिकेची देखील परिस्थिती होईल अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच सत्तेत असणाऱ्यांपैकी कोणालाही मुंबईची आपुलकी नाही असं मत पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत चारशे किलोमीटरचे रस्ते एका वर्षात पूर्ण केले जातील अशी घोषणा सार्वजनिक कार्यक्रमातून केली होती. मात्र, या संबंधित अधिवेशनात बोलताना अशा कामांना जवळपास तीन वर्षाचा कालावधी लागेल असे स्वतः त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केवळ जनतेची दिशाभूल करत असल्याचं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

टेंडर घेण्यात पाचही कंपन्यांचे साट लोट - मुंबई होणाऱ्या कामांचं पाच डिव्हिजनमध्ये विभाजन केलं जातं. या चारशे किलोमीटरच्या कामांचे देखील या पाच डिव्हिजनमध्ये विभाजन केले असून, पाच कंपन्यांना या पाच डिव्हिजनची कामे मिळाली आहेत. मात्र या पाच कंपन्यांनी कामांचे टेंडर भरताना केवळ पाच कंपन्यांमध्येच टेंडर मिळेल असे टेंडर भरण्यात आली आहेत. एका डिव्हिजनसाठी पहिल्या संबंधित कंपनीने कमी दरात टेंडर भरल्यानंतर, इतर जागी त्याच कंपनीने त्याच कामासाठी जास्त पैशात टेंडर भरले. त्यामुळे कमी टेंडर भरलेल्या कंपनींना आपोआप त्या डिव्हिजनचे काम मिळालं. मात्र एकच काम एकच कंपनी एका डिव्हिजनमध्ये वेगळ्या किमतीत तर, दुसऱ्या डिव्हिजनमध्ये वेगळ्या किमतीत असे दर कसे काय भरू शकतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - Aaditya Thackeray Letter : महाविकास आघाडी काळातील प्रकल्पांना पालिकेचा 'खो'; आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.