ETV Bharat / state

स्थलांतरित मजुरांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी ज्येष्ठ वकिलांनी ठोठावला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा - स्थलांतरीत मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

कामगार आणि कष्टकऱ्यांना वेळोवेळी न्याय मिळवून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंग, ॲड. आनंद ग्रोव्हर, ॲड. प्रशांत भूषण, संजय पारीख यांच्यासोबत अनेक निवृत्त न्यायाधिशांची एक मोठी टीम स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्न घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे

senior lawyers in supreme court  senior lawyers for migrant workers  migrant workers issue  स्थलांतरीत मजुरांबाबत ज्येष्ठ वकील  स्थलांतरीत मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका  स्थलांतरीत मजूर समस्या
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : May 28, 2020, 4:32 PM IST

Updated : May 28, 2020, 6:07 PM IST

मुंबई - कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियोजन न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात लाखो मजुरांचे हाल होत आहेत. अनेकांना आपले गाव गाठण्यासाठी पायी प्रवास करावा लागत असून यात अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यांच्या या वेदनेला वाचा फोडण्यासाठी देशातील नामवंत वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

स्थलांतरित मजुरांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी ज्येष्ठ वकिलांनी ठोठावला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा

कामगार आणि कष्टकऱ्यांना वेळोवेळी न्याय मिळवून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंग, ॲड. आनंद ग्रोव्हर, ॲड. प्रशांत भूषण, संजय पारीख यांच्यासोबत अनेक निवृत्त न्यायाधिशांची एक मोठी टीम स्थलांतरित मजुरांच्या प्रश्न घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. यासंदर्भात सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी सांगितले की, देशात स्थलांतरीत मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. देशभरात मजूर आपल्या मुलाबाळांसोबत चालत निघालेले आहेत. त्यांची एका बाजूला उपासमार होते आणि दुसरीकडे ते आपल्या गावी पोहोचू शकत नाहीत, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मजुरांचे हाल विविध राज्यात होत आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, ती यापूर्वी फेटाळली गेली होती. त्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणात्मक वाटचालीत आत्ता हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे सांगून ती फेटाळण्यात आली होती.

आता मजुरांचे जे प्रचंड हाल आहेत, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक ज्येष्ठ वकिलांनी सर्वोच्च न्यायालाला एक निवेदन दिलेले आहे. ही अंत्यत महत्वाची बाब आहे. त्यामुळे याची दखल घ्यायला हवी, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात निवेदन दाखल केले आहे. सर्वहारा जन आंदोलन आणि अंगमेहनत व कष्टकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आदींनीही राज्यातील मजुरांची व्यथा मांडली आहे, असे महाजन यांनी सांगितले. तसेच त्याची दखल घेऊन नयायायालयाने सुनावणी सुरू केली असून त्याची पहिली तारीख आज आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलांसोबत राज्याच्या वतीने गायत्री सिंग या काम करत असल्याचेही महाजन म्हणाल्या.

Last Updated : May 28, 2020, 6:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.