ETV Bharat / state

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त शांती मार्च

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान ते मनी भवन या दरम्यान शांती मार्च काढण्यात आला होता.

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त शांती मार्च
author img

By

Published : Oct 2, 2019, 11:33 PM IST

मुंबई - महात्मा गांधीजी यांनी सगळ्या जाती, धर्म, भाषा, प्रांत, महिला, पुरुष आदींना एकत्र करुन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. तोच संदेश घेऊन आम्ही आज त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शांती मार्च काढला आहे. देशातील जनतेनी जात, धर्म, पंथ, आदी सर्व विसरुन एकत्र राहवे. हीच महात्मा गांधी यांना खरी श्रद्धाजली ठरेल, असा विश्वास गांधीवादी नेते व खासदार हुसेन दलवाई यांनी आज व्यक्त केला.

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त शांती मार्च

हेही वाचा- भाजपचे 'कुबेर'..! मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान ते मनी भवन या दरम्यान शांती मार्च काढण्यात आला होता. यावेळी दलवाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना हा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, की महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची लढाई ही खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत नेली होती. कितीही लाठ्या-काठ्या पडल्या आणि हल्ला झाला तरी आपण हिंसा करायची नाही, अशी शिकवण त्यांनी दिली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यापाड्यातील लोकांना तुम्ही स्वतंत्र व्हाल, असे त्यांनी स्वप्न दाखवले. त्यामुळे देशभरातून मोठ्या प्रमाणात लोक स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीसाठी समोर आले. काही लोकांनी त्यावेळी विरोध केला आणि अजूनही विरोध करणे सुरू आहे. गांधीजींचे पुतळे तयार करुन त्याला गोळ्या मारण्याचे कारस्थान करतच आहेत. मात्र, हा देश गांधीजींच्या विचाराने त्या मार्गाने जाणारा आहे. हे लक्षात घेतले पाहिजे, असेही मत दलवाई यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- विलासरावांचे धाकटे चिरंजीवही निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून रमेश कराडांचा पत्ता कट

सबंध जगामध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांचे एक आकर्षण आहे. त्यामुळेच पंतप्रधानांना अमेरिकेत जाऊन सांगावे लागले की, भारत हा नेहरू आणि गांधी यांच्यामुळे ओळखला जातो. त्यामुळे गांधीजींना या देशाचे राष्ट्रपिता आपण म्हणतो. महावीर गौतम बुद्ध, महावीर याचे विचार महात्मा गांधी यांनी अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे काम केले. गांधीजींना विरोध करणारा जो वर्ग आहे तो त्यांच्या जिवंतपणी होता. त्यावेळी वल्लभाई पटेल यांनी स्पष्ट केले होते. ज्या संस्था यांच्या विरोधात त्यांनीच त्यांचा खून केला. त्यामुळेच आज गांधी यांचा पुतळा इथे उभा करुन त्याला गोळ्या घातल्या जात आहेत. परंतु त्यावर दुर्दैवाने सरकार काही करत नसल्याची खंत दलवाई यांनी व्यक्त केली.

Intro:
जात, धर्म, पंथ आदी विसरून सर्वांनी एकत्र राहावे, हेच महात्मा गांधी यांना खरे अभिवादन - हुसेन दलवाई

mh-mum-01-gandhi150-santimarch-dalvai-121-7201153

(फीड mojo var पाठवले आहे)

मुंबई, ता. २:
महात्मा गांधीजी यांनी सगळ्या जाती, धर्म,भाषा, प्रांत, महिला, पुरुष आदींना एकत्र करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. तोच संदेश घेऊन आम्ही आज त्यांच्या १५० व्या जयंती निमित्त शांती मार्च काढला आहे. देशातील जनतेनी जात, धर्म, पंथ, आदी सर्व विसरून एकत्र राहावे,हीच महात्मा गांधी यांना खरी श्रद्धाजली ठरेल असा विश्वास गांधीवादी नेते व खासदार हुसेन दलवाई यांनी आज व्यक्त केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी १५० व्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान ते मनी भवन या दरम्यान शांती मार्च काढण्यात आला होता. यावेळी दलवाई यांनी ' ई टीव्ही भारत शी बोलताना हा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले की,महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची लढाई ही खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत नेली होती.कितीही लाठ्या काठ्या पडल्या आणि हल्ला झाला तरी आपण हिंसा करायची नाही, अशी शिकवण त्यांनी दिली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यापाड्यातील लोकांना तुम्ही स्वतंत्र व्हाल असे त्यांनी स्वप्न दाखवलं. त्यामुळे देशभरातून मोठ्या प्रमाणात लोक स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीसाठी समोर आले. काही लोकांनी त्यावेळी विरोध केला आणि अजूनही विरोध करणे सुरू आहे. गांधीजींचे पुतळे तयार करून त्याला गोळ्या मारण्यात कारस्थान करतच आहेत. मात्र हा देश गांधीजींच्या विचाराने त्या मार्गाने जाणारा आहे हे लक्षात घेतले पाहिजे असेही मत दलवाई यांनी व्यक्त केले.

सबंध जगामध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांचे आल एक आकर्षण आहे.त्यामुळेच पंतप्रधानांना अमेरिकेत जाऊन सांगावे लागले की, भारत हा नेहरू आणि गांधी यांच्यामुळे ओळखला जातो. त्यामुळे त्यामुळे गांधीजींना या देशाचे राष्ट्रपिता आपण म्हणतो. महावीर गौतम बुद्ध, महावीर याचे विचार महात्मा गांधी यांनी अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचं काम केलं.गांधीजींना विरोध करणारा जो वर्ग आहे तो त्यांच्या जिवंतपणी होता. त्यावेळी वल्लभाई पटेल यांनी स्पष्ट केलं होतं ज्या संस्था यांच्या विरोधात त्यांनीच त्यांचा खून केला. त्यामुळेच आज गांधी यांचा पुतळा इथे उभा करून त्याला गोळ्या घातल्या जात आहेत.परंतु त्यावर दुर्देवाने सरकार काही करत नसल्याची खंत दलवाई यांनी व्यक्त केली.

Body:
जात, धर्म, पंथ आदी विसरून सर्वांनी एकत्र राहावे, हेच महात्मा गांधी यांना खरे अभिवादन - हुसेन दलवाई
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.