ETV Bharat / state

मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ मतिमंद महिलेची प्रसूती;महिला पोलिसामुळे वाचले प्राण

४ जुलै रोजी रात्री मेट्रो सिनेमाजवळ एक महिला फुटपाथवर प्रसुतीच्या कळांनी विव्हळत होती. याबाबत मुंबई पोलीस दलातील आजाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड यांना माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी त्या महिलेची काळजी घेत प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांना बोलावून नवजात बाळ आणि मातेला रुग्णालयात दाखल केले.

मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ मतिमंद महिलेने दिला बाळाला जन्म

author img

By

Published : Jul 8, 2020, 4:30 PM IST

मुंबई - मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ रस्त्यावर राहणाऱ्या एका मतिमंद महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. मात्र बाळाला जन्म देणारी मतिमंद महिला व तिचे बाळ आज जर सुखरूप असेल तर ते मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकामुळे. प्रिया गरुड असे या महिला पोलीस अधिकारीचे नाव आहे.

४ जुलै रोजी रात्री मेट्रो सिनेमाजवळ एक महिला फुटपाथवर प्रसुतीच्या कळांनी विव्हळत होती. याबाबत मुंबई पोलीस दलातील आजाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड यांना माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. प्रिया गरुड यांनी तत्काळ मेट्रो सिनेमाच्या जवळ असलेल्या सर्व रुग्णालयांना मोबाईलवरुन संपर्क साधला. मात्र, कुठल्याही रुग्णालयाने या संदर्भात मदत करण्यात नकार दिला. सध्या कोविडची परिस्थिती पाहता आम्ही मदत करण्यास असमर्थ असल्याचेही उत्तर त्यांना परिसरातील प्रत्येक रुग्णालयाकडून मिळत होते.

यानंतर प्रिया गरुड यांनी मेट्रो सिनेमाजवळ असलेल्या कामा रुग्णालयातील डॉक्टरांना संपर्क साधून मदत मागितली. गरोदर महिलेला प्रसूती कळा ह्या सुरूच होत्या. मात्र, कामा रुग्णालयात त्यावेळी केवळ एकच डॉक्टर असल्याकारणाने ते रुग्णालयाबाहेर येऊ शकत नव्हते. या घटनेला ३ तास ओलांडल्यानंतर संबंधित महिलेजवळ रुग्णवाहिकेसह डॉक्टर आले. मात्र, त्या आगोदरच महिलेची प्रसूती झालेली होती. मात्र, महिला व तिच्या बाळाची नाळ ही अजूनही तशीच असल्याचे लक्षात आल्यावर तिला त्या रुग्णवाहिकेद्वारे कामा रुग्णालयात नेण्यात आले.

या कारणामुळे नाही वापरली पोलिसांची गाडी

प्रसूती कळा सहन करत असलेल्या महिलेला पोलीस वाहनाने रुग्णालयात नेण्यात येऊ शकत होते. मात्र, पोलिसांच्या वाहनाने जर या महिलेला नेण्यात आले असते तर कदाचित तिला व तिच्या बाळाला कोरोना किंवा इतर गोष्टींचा संसर्ग होऊ शकला असता. त्यामुळे या भीतीपोटी प्रिया गरुड यांनी शेवटपर्यत रुग्णवाहिका मागविण्याचा प्रयत्न केला. सध्या बाळ व त्याची आई हे दोघेही सुखरूप असून डॉक्टारांच्या देखरेखीखाली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.