ETV Bharat / state

Mumbai Fire News : मालाडमध्ये १०० हून अधिक झोपड्या जळून खाक, 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

मालाड पूर्व येथील आंबेडकर नगर येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक तासापासून आग विझवण्याचे काम सुरू होत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीत 100 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Fire News
पूर्व आंबेडकर नगर झोपडपट्टीला भीषण आग
author img

By

Published : Feb 13, 2023, 11:57 AM IST

Updated : Feb 13, 2023, 2:26 PM IST

झोपडपट्टीला भीषण आग, 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

मुंबई: पश्चिम उपनगर मालाडच्या पूर्वेकडील जामर्षी नगर येथील वनजमिनीवरील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत 10 ते 15 झोपडपट्टीवासी जखमी झाले आहेत. 100 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत

15 सिलिंडरचा स्फोट: जळत्या झोपडीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने कागदाचा तुकडा घशात अडकल्याने 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. येथील वनजमिनीवर प्लॅस्टिक व लोखंडी पत्र्याने बनविलेल्या झोपड्या आहेत. तर सिलिंडरचा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी तर जीव वाचवण्यासाठी घरातून पळ काढला. त्यामुळे एकापाठोपाठ एक 15 सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

दामूनगर नंतरची सर्वात मोठी आग: 4 डिसेंबर 2015 रोजी कांदिवलीच्या जंगलात असलेल्या दामुंगर येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. या आगीत 7 झोपडीमालकांचा मृत्यू झाला होता. तर 25 जण जखमी झाले होते. या आगीच्या सात वर्षांनंतर जामऋषी नगर येथील झोपडपट्टीत पुन्हा अशीच आग लागली आहे. त्यामुळे मुंबईतील वनजमिनीवर बांधलेल्या झोपडपट्ट्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिंदे-फडणवीस सरकार आता पुनर्वसन करणार का?.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: जळत्या झोपडीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. येथील वनजमिनीवर प्लॅस्टिक व लोखंडी पत्र्याने बनविलेल्या झोपड्या आहेत. सकाळी १०:३० च्या दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. 11.11 वाजता जम्रिशी नगर, वागेश्र्वरी मंदिर, कुरार विलेज, मालाड पूर्व झोपड्यांना आग लागली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल तर 4 फायर इंजिन, 2 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कंपनीमध्ये अचानक लागली आग: याआधीही अशीच आगीची घटना घडली होती. रविवारी दुपारच्या सुमारास जेवणाची वेळ असल्याने काही कामगार जेवणासाठी गेले होते. त्याच सुमाराला कंपनीमध्ये अचानक आगीने पेट घेतला होता. काही क्षणातच आगीने भीषण रुप धारण केले होते. या आगीचे धूर ६० ते ७० उंच फूट हवेत दिसत असल्याने आसपासच्या कंपनीमधील कामगारांनीही कंपनी बाहेर पळ काढला. तर केमिकलचे स्फोट होत असल्याने परिसरात अधिकच भीतीचे वातावरण पसरून नागरिकांनीही पळ काढला. तर बदलापूर पूर्वेतील एमआयडीसी वसाहतीत असलेल्या गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीमध्ये ज्वलनशील केमिकल मोठ्या प्रमाणात साठा होता.

अग्निशमन दलाचे प्रयत्न : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बदलापूरसह अंबरनाथ एमआयडीसी तसेच अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महापालिका आणि तळोजा एमआयडीसी मधील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत होत्या. विशेष म्हणजे, बदलापूर एमआयडीसी वसाहतीत असलेल्या अग्निशामक दलाच्या केंद्राच्या समोरच गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जात होते. मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली होती.

हेही वाचा: Fire At Chemical Company In Badlapur बदलापूर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग

Last Updated : Feb 13, 2023, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.