मुंबई : बोरिवली पश्चिम परिसरातील गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागली. त्यामुळे सोसायटी कॅम्पसमध्ये खळबळ उडाली. घाईघाईत सोसायटीच्या लोकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान 4 अग्निशमन गाड्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
सातव्या मजल्यावर भीषण आग
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 'सकाळी आग लागली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुरक्षा केबिनमध्ये आग लागली. अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत'.
एक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, एक अग्निशामक कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जखारिया कंपनीत स्फोट; एक ठार, पाच कामगार जखमी