ETV Bharat / state

Drug Peddler Arrested :गुलजार मकबूल अहमद खान या ड्रग्ज तस्कराला श्रीनगर येथून अटक - गुलजार मकबूल अहमद खान या ड्रग्ज तस्कराला अटक

मुंबई पोलीसांनी गुलजार मकबूल अहमद खान या ड्रग्ज तस्कराला अटक अंमली पदार्थ-दहशतवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून श्रीनगर येथून अटक केली आहे.

A drug peddler
A drug peddler
author img

By

Published : Jan 15, 2022, 12:59 PM IST

Updated : Jan 15, 2022, 1:45 PM IST

मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत काश्मीरमधून गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. ऑक्टोंबर 2021 मध्ये दहिसर परिसरात कारवाई करत अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका कुटुंबाचा 4 लोकांना अटक करण्यात आली होता. त्यातील मुख्य आरोपी फरार होता त्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

अनेक दिवसांपासून नियोजन
काही महिन्यांपूर्वी मुंबई क्राईम ब्रँचने 24 किलो ड्रग्जसह 4 जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गुलजार मकबूल अहमद खान याचे नाव समोर आले होते, त्यानंतर मुंबई पोलीस अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याचे नियोजन करत होते. यासाठी मुंबई क्राइम ब्रँचचे 7 जणांचे पथक काश्मीरला गेले आणि गुलजार मकबूल अहमद खान याच्या मुसक्या आवळल्या.

दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल
काश्मीरमधील सुमारे 100 काश्मिरी पोलिसांनी मुंबई पोलिसांना बॅकअप दिला. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने आरोपीला शेरगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरमल बाग परिसरातून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलजार मकबूल अहमद खान हा कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल असू शकतो आणि ते नार्को टेररिझमचे प्रकरण असू शकते, असा संशय आहे. याचधर्तीवर मुंबई तपास सुरु आहे.

अतिसंवेदनशील परिसरात वास्तव्य
विशेष म्हणजे हा आरोपी ज्या श्रीनगरच्या मगरमल बाग परिसरात राहतो. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. तसेच या परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याने मुंबई पोलिसांना संरक्षणासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातील 100 काश्मिरी पोलिसांची मदती घ्यावी लागली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात चरस तस्करी होत असून यांचा संबध नार्को टेरिरिझमसाठी असल्याचे समोर आले आहे. मात्र आरोपींच्या यादीत गुलजारचे नाव नव्हते. मुंबई पोलिसांनी त्याला ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक केल्याने काश्मिर पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. काश्मिरी चरस दर्जेदार असल्याने बाजारात नेहमीच त्याला मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी आरोपी चरस तस्करीकरून पैसे कमवण्यासाठी हा धोका पत्करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Last Updated : Jan 15, 2022, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.