ETV Bharat / state

Mumbai Suicide : धारावीतील एका हॉटेलमध्ये ३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

धारावीतील एका हॉटेलमध्ये ३४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेसिडेन्सी नावाच्या हॉटेलमध्ये त्याने ही आत्महत्या केली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Suicide
Suicide
author img

By

Published : May 24, 2023, 10:56 PM IST

मुंबई : सायन येथील रेसिडेन्सी नावाच्या हॉटेलमध्ये 34 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्या व्यक्तीने रेसिडेन्सी नावाच्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. मृताच्या मनगटावर, मानेवर कात्रीच्या जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. धारावी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हाॅटेलात केली आत्महत्या : धारावी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायनच्या एलबीएस रोडवर असलेल्या हॉटेल सायन रेसिडेन्सीच्या एका खोलीत एक व्यक्तीने आत्मत्या केल्याची माहिती मिळाली होती. ज्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी धारावी पोलिसांना दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी दुपारी २.४५ वाजता हॉटेल सायन रेसिडेन्सीचे कर्मचारी सचिन दुबे यांनी खोलीच्या खिडकीतून एका व्यक्तीलने त्यांना त्यांना हाॅटेलात पाहिले होते. या व्यक्तीने खोली आतून बंद केली आहे. धारावी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सदर व्यक्तीने गळफास घेतल्याचे आढळून आले. सुरजसिंग बघेल असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी आहे.

कारण अद्याप अस्पष्ट : धारावी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताने आधी डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलीसांना आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही बघेल यांना सायन रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पुढे पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीने हॉटेलमध्ये दिलेला पत्ता चुकीचा आहे, आम्ही त्याचे खरे नाव आणि पत्ता शोधत आहोत. मृत व्यक्तीने त्याचा फोनही फॉरमॅट केला आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस मृतांच्या नातेवाइकांची माहिती काढत आहेत. बघेल मुंबईत कधी आणि का आला याचा शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा-

  1. Nashik Crime : धक्कादायक! वाढदिवसानिमित्ताने अल्पवयीन मैत्रिणीला घरी बोलावले अन् केला बलात्कार
  2. Amravati Crime News: 13 दिवसांपासून सुरू असलेली चिमुकलीची झुंज संपली... विष देणाऱ्या आईविरोधात गुन्हा दाखल
  3. Court verdict :.... तर बायकोला पोटगीचा अधिकार नाही - उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.