ETV Bharat / state

मुंबईत ९९ वर्षीय एच. एम. प्रभूंनी केले सलग १७ व्या लोकसभेचे मतदान

मुंबईतील ९९ वर्षीय एच. एम. प्रभू यांनी १९५२ ते २०१९ असे सलग १७ लोकसभेसाठी मतदान केले. यावेळी ते ईटीव्हीशी संवाद साधताना म्हणाले, आजपर्यंत मी कधीही मतदान चुकवले नाही. उद्या काय होईल याची शाश्वती नाही. आजही देशात गरीबी आहे. ते नष्ट झाले पाहिजे. लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत. तसेच जगभरात देशाची मान उंच होण्यासाठी आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

९९ वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 29, 2019, 9:21 PM IST

मुंबई - चौथ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान पार पडले. सर्वसामान्य मतदाराबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार पार पाडला. यावेळी १९५२ ते २०१९ असे सलग १७ लोकसभेसाठी मतदान केलेल्या एच. एम. प्रभू यांनी ईटीव्हीशी विशेष संवाद साधला.

९९ वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

यावेळी बोलताना प्रभू म्हणाले, की १९५२ मध्ये पहिल्यांदा मतदान करताना देशप्रेमाची भावना होती. त्यावेळी उमेदवार लोककल्याणासाठी उभे राहिले. विशेष म्हणजे कोणालाही पैशाची हाव नव्हती. अलीकडे कोणत्याच उमेदवारांमध्ये लोककल्याणाची भावना दिसत नाही. जसे की प्रत्येक उमेदवार पैसे कमवण्यासाठीच उभा राहिला, असे वाटते.

पहिल्या मतदानासंदर्भात आपल्या आठवणी सांगताना प्रभू म्हणाले, की पहिले मतदान हे अविस्मरणीय होते. त्यावेळी मी चले जाव आंदोलनात सहभागी झालो होतो. ब्रिटिश सरकारने अश्रूधूर सोडले, अत्याचार केले. परंतु लोकांनी जुमानले नाही. देशप्रेमाची भावना उस्फुर्त होती. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता होतो. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचो. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू या सर्वांना प्रत्यक्ष भेटता आले. तसेच सुभाषचंद्र बोस यांची मुंबईतील सभा मी पाहिल्या आहेत.

आजपर्यंत मी कधीही मतदान चुकवले नाही. उद्या काय होईल याची शाश्वती नाही. आजही देशात गरीबी आहे. ते नष्ट झाले पाहिजे. लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत. तसेच जगभरात देशाची मान उंच होण्यासाठी आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे प्रभू यांनी यावेळी सांगितले.

सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा द्यायला हव्यात. ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर आल्यावर त्यांचे हाल होतात. ९९ वर्षीय मला दुसऱ्या मजल्यावर मतदान करायला जावे लागले. त्यामुळे मला आज त्रास झाला. वृद्ध हवेत की नकोत हे सरकारने सांगावे, अशी भावना एच. एम. प्रभू यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

Intro:मुंबईत चौथ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले सर्वसामान्य मतदार बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा अधिकार पार पाडला 1952 ते 2019 अशी सलग सतरा लोकसभेसाठी मतदान पार पडलेल्या प्रभू यांनी ईटीसी विशेष संवाद साधला.

Body:सरकारला वृद्ध नको इतका ऑल टाइम वॉटरचे भावना

एच एम प्रभूंनी केले सलग 17 व्या लोकसभेचे मतदान
मुंबई:
सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा द्यायला हव्यात ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर आल्यावर त्यांचे हाल होतात 99 वर्षीय मला दुसऱ्या मजल्यावर ती मतदान करायला लावले.आज त्रास झाला सरकारने एक सांगावे त्यांना वृद्ध हवेत की नकोत अशी भावना एच एम प्रभू यांनी ईटीवी भारत बोलताना व्यक्त के ली. 1952 मध्ये पहिल्यांदा मतदान करताना देशप्रेमाची भावना होती प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे त्यांनी सांगितले आज पर्यंत कधीही मतदान चुकले नाही उद्या काय होईल याची शाश्वती नाही. परंतु जगभरात देशाची मान उंच होण्यासाठी आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे .1952 मध्ये पहिल्यांदा मतदान केले होते त्यावेळची भावना वेगळी होती. त्यावेळी उमेदवार लोककल्याणासाठी उभे राहिले विशेष म्हणजे कोणालाही पैशाची हाव नव्हती अलीकडे कोणत्याच उमेदवारांमध्ये लोकल देण्याची भावना दिसत नाही .जसे की प्रत्येक उमेदवार पैसे कमवण्यासाठी उभा राहिला पहिले मतदान हे अविस्मरणीय होते मी चले जाव आंदोलनात सहभागी झालो होतो ब्रिटिश सरकारने अश्रूधूर सोडले अत्याचार केले परंतु लोकांनी जुमानले नाही देशप्रेमाची भावना उस्फुर्त होती मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता होतो त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे जवाहर नेहरू महात्मा गांधी सरोजिनी नायडू सर्वांना प्रत्यक्ष भेटता आले सुभाषचंद्र बोस यांची मुंबईतील सभा मी पाहिले आजही देशात गरीबी आहे लोकांचा मूलभूत सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत त्यासाठी प्रत्येकाने न चुकता मतदान केलेच पाहिजे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.