ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 953 नवे रुग्ण; 44 रुग्णांचा मृत्यू - corona update mumbai

मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांवर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज कोरोनाचे 953 नवे रुग्ण आढळून आले, तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 2 हजार 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

corona update mumbai
कोरोना आढावा मुंबई
author img

By

Published : May 18, 2021, 10:09 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांवर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज कोरोनाचे 953 नवे रुग्ण आढळून आले, तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 2 हजार 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा - एसटी महामंडळाचा अजब कारभार, प्रशिक्षणार्थी कामगारांना वेतन नाही

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 255 दिवस

मुंबईत आज 953 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 90 हजार 889 वर पोहचला आहे. आज 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 352 वर पोहचला आहे. 2 हजार 258 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 41 हजार 598 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 32 हजार 925 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 255 दिवस इतका आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 78 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 305 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 17 हजार 920, तर आतापर्यंत एकूण 59 लाख 34 हजार 165 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अशी कमी झाली रुग्ण संख्या

1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - राज्यात 'म्यूकर मायकोसिस'च्या रुग्णसंख्येत वाढ; मुंबईत 111, तर नागपूरमध्ये 40 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.