मुंबई - शहरात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवस 8 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते. आज 9 हजार 327 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 06 हजार 087 वर पोहचली आहे.
91 हजार 108 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 9 हजार 327 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 10 हजार 225 वर पोहचला आहे. आज 50 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 959 वर पोहचला आहे. 8474 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 06 हजार 087 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 91 हजार 108 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 34 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 79 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 799 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 45 लाख 58 हजार 630 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.