ETV Bharat / state

गणेश नाईकांचं अखेर ठरलं! 'या' दिवशी करणार भाजपमध्ये प्रवेश - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे अखेर ठरलंय. त्यांना भाजप प्रवेशाचा मुहुर्त सापडला आहे. गणेश विसर्जनाच्या आधी म्हणजेच येत्या 9 सप्टेंबरला नवी मुंबईत एका भव्य दिव्य कार्यक्रमात गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गणेश नाईक
author img

By

Published : Sep 1, 2019, 6:10 PM IST

मुंबई - नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे अखेर ठरलंय. त्यांना भाजप प्रवेशाचा मुहुर्त सापडला आहे. गणेश विसर्जनाच्या आधी म्हणजेच येत्या 9 सप्टेंबरला नवी मुंबईत एका भव्य दिव्य कार्यक्रमात गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

गणेश नाईक यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईकदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसंच गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा जे पी नड्डा हे देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय.

गणेश नाईकांचं अखेर ठरलं!

गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार नेते असून, त्यांना साजेसा असा पक्ष प्रवेश व्हावा अशी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा होती. ते वाजतगाजत दिमाखात पक्षांतर करणार असल्याचं बोललं जातं होतं. गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन नाईक यांना गेल्याने नाईक यांची द्विधा मनस्थिती झाली होती. त्यामुळे पक्षांतराबाबतचा त्यांचा निर्णय डळमळीत झाल्याच्या चर्चा नवी मुंबईत कालपासूनच ऐकायला मिळत होत्या.

बिकट काळात साथ देणाऱ्या शरद पवार यांची साथ सोडणे योग्य होणार नाही, असा नाईक यांचा विचार असल्याचे बोलले जात होते. त्यातच काल नवी मुंबईत सुप्रिया सुळे संवाद यात्रेच्या कार्यक्रमासाठी आल्या असताना माजी खासदार संजीव नाईक यांनी आपल्या पत्नीसोबत सुप्रिया सुळेंची भेट घेतली. यावरून संजीव नाईक हे राष्ट्रवादीतच राहणार आणि नाईक कुटुंबीयात फूट पडणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, आता गणेश नाईक हे त्यांच्या मुलासह भाजप प्रवेश करणार हे निश्चित झालं असून नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठ खिंडार पडलं आहे.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

नवी मुंबई

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे किंगमेकर असलेले दिग्गज नेते गणेश नाईक यांना अखेर त्यांच्या बीजेपी ग्रँड एन्ट्रीसाठी मुहुर्त सापडलाय...गणेश विसर्जनाच्या आधी म्हणजेच येत्या 9 सप्टेंबरला नवी मुंबईत एका भव्य दिव्य कार्यक्रमात राष्ट्रवादीचे गणेश नाईक हे भाजपात ग्रँड एन्ट्री करणार आहेत. या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात केवळ गणेश नाईकच नव्हे तर त्यांचा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक देखील भाजपात पक्ष प्रवेश करणार आहेत. तसंच गणेश नाईकांच्या ग्रँड एन्ट्रीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा जे पी नड्डा हेदेखील उपस्थिती लावणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या गणेश विसर्जनाच्या आधीच नवी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचं विसर्जन होणार हे मात्र नक्की....Body:गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार नेते असून त्यांना साजेसा असा पक्ष प्रवेश व्हावा अशी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने ते वाजतगाजत दिमाखात पक्षांतर करणार असल्याचं बोललं जातं होतं.गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन नाईक यांना गेल्याने नाईक यांची द्विधा मनस्थिती झाली आणि त्यामुळे पक्षांतराबाबतचा त्यांचा निर्णय डळमळीत झाल्याच्या चर्चा नवी मुंबईत काल पासूनच ऐकायला मिळत होत्या. बिकट काळात साथ देणाऱ्या शरद पवार यांची साथ सोडणे योग्य होणार नाही, असा नाईक यांचा विचार असल्याचे बोलले जात होते. त्यातच काल नवी मुंबई सुप्रिया सुळे संवाद यात्रेच्या कार्यक्रमासाठी आल्या असताना माजी खासदार संजीव नाईक यांनी आपल्या पत्नीसोबत सुप्रिया सुळेंची भेट घेतली. यावरून संजीव नाईक हे राष्ट्रवादीतच राहणार आणि नाईक कुटुंबियात फूट पडणार अशी चर्चा जोर धरू लागली.Conclusion: मात्र आता गणेश नाईक हे त्यांच्या मुलासह भाजप प्रवेश करणार हे निश्चित झालं असून नवी मुंबई राष्ट्रवादी पडलेलं भगदाड भरून काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रमिला पवार, ईटीव्ही भारत, नवी मुंबई
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.