ETV Bharat / state

राज्यात कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद; ४२ रुग्णांना घरी सोडले - राजेश टोपे

राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३ नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

rajesh tope
राजेश टोपे
author img

By

Published : Apr 2, 2020, 11:33 PM IST

मुंबई - राज्यात आज (गुरुवारी) कोरोनाबाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगर आणि ११ रुग्ण हे पुण्यातील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलडाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला; ४ रुग्णांचे तपशील -

1) वय-६१ वर्षे, लिंग-पुरुष: हा रुग्ण दिनांक ३१ मार्च रोजी नायर रुग्णालयात भरती झाला होता. त्याला रक्ताचा कर्करोग होता. काल दुपारी मृत्यू झाला.

2) वय-५८ वर्षे लिंग- पुरुष: मूत्रपिंडाचा जुनाट आजार असणारा हा रुग्ण २९ तारखेला भरती झाला होता. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. काल संध्याकाळी सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

3)वय-५८ वर्षे लिंग- पुरुष: हा रुग्ण २६ मार्च रोजी एका खाजगी रुग्णालयात भरती झाला. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.

4) वय-६३ वर्षे, लिंग- पुरुष: या रुग्णाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात आज संध्याकाळी झाला.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २० झाली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील -
मुंबई - २३५
पुणे (शहर, ग्रामीण भाग) - ६१
सांगली - २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा - ४५
नागपूर - १६
यवतमाळ - ४
अहमदनगर - १७
बुलढाणा - ५
सातारा, औरंगाबाद प्रत्येकी - ३
कोल्हापूर - २
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी - १

एकूण ४२३ त्यापैकी ४२ जणांना घरी सोडले तर २० जणांचा मृत्यू -

राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३ नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार २४४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिल्लीतील मर्कझ कार्यक्रमात सहभागींचा कसून शोध सुरू -

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १०६२ व्यक्तींच्या यादीपैकी ८९० व्यक्तींशी संपर्क झाला असून, त्यापैकी ५७६ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ४ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३७३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.