मुंबई - गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत घट होत होती. मात्र, आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज ८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६९ दिवासांवरून २४० दिवसांवर गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
११ हजार ५३१ सक्रिय रुग्ण -
मुंबईत काल कोरोनाचे ८५८ नवे रुग्ण आढळून आले असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १६ रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १४ पुरुष तर ५ महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ६७ हजार ६०४ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा १० हजार ५२२ वर पोहोचला आहे. मुंबईत काल २ हजार १७५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा २ लाख ४१ हजार ९७५ वर गेला आहे. सध्या मुंबईत ११ हजार ५३१ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी २४० दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २४० दिवस, तर सरासरी दर ०.२९ टक्के आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ४९३ चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, ५ हजार ६३६ इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी १६ लाख ५९ हजार ३०२ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
७ नोव्हेंबर - ५७६ रुग्ण
२ नोव्हेंबर - ७०६ रुग्ण
३ नोव्हेंबर - ७४६ रुग्ण
६ नोव्हेंबर - ७९२ रुग्ण
९ नोव्हेंबर - ५९९ रुग्ण
१० नोव्हेंबर - ५३५ रुग्ण
हेही वाचा- राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, दिशा कायद्याचे काय झाले?