ETV Bharat / state

मुंबईकरांना किंचितसा दिलासा; 855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचे 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते, मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. गेले चार दिवस मुंबईत एक हजाराच्यावर रुग्ण आढळून आले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 1, 2021, 7:57 PM IST

Updated : Mar 1, 2021, 8:15 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचे 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते, मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.

गेले चार दिवस मुंबईत एक हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यात आज किंचितशी घट झाली. आज 855 नवे रुग्ण आढळून आले असून, 876 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या आज अधिक आहे. तर, 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - अर्थसंकल्पीय अधिवेशन : सायकलने विधान भवनात येत कॉंग्रेस आमदारांकडून इंधन दरवाढीचा निषेध

कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबईत आज 855 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 26 हजार 770 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 474 वर पोहचला आहे. 876 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 4 हजार 736 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 9 हजार 690 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 244 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 10 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 137 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 32 लाख 91 हजार 721 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट

मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

रुग्णसंख्या वाढली

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1 हजार 167, 25 फेब्रुवारीला 1 हजार 145, 26 फेब्रुवारीला 1 हजार 34, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1 हजार 51, तर आज 1 मार्चला 855 नवे रुग्ण आढळून आले.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 सर्वात कमी रुग्ण आढळून आले.

हेही वाचा - राज्यपाल कोश्यारी राजधर्म कधी पाळणार? शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

Last Updated : Mar 1, 2021, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.