ETV Bharat / state

मुंबईत मंगळवारी 846 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 107 जणांचा मृत्यू - mumbai corona total patients

मंगळवारी 107 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 42 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 65 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 107 मृत्यूपैकी 79 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 64 पुरुष आणि 43 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 60 जणांचे वय 60 वर्षांवर तर 40 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 24, 2020, 2:25 AM IST

मुंबई - येथे मंगळवारी 846 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 107 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 68 हजार 481 वर पोहचला आहे. तसेच मृतांचा आकडा 3 हजार 842 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 34 हजार 576 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत याठिकाणी सध्या 30 हजार 063 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मंगळवारी 107 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 42 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 65 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 107 मृत्यूपैकी 79 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 64 पुरुष आणि 43 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 60 जणांचे वय 60 वर्षांवर तर 40 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

मुंबईमधून मंगळवारी 457 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 34 हजार 576 वर पोहचला आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : स्वतःचं घरं केलंय क्वारंटाइन सेंटर, पिसादेवी गावातील तरुणाचा स्तुत्य उपक्रम

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 16 ते 22 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.86 टक्के इतका आहे. तर रुग्णवाढीचा दर 38 दिवसांवर पोहचला आहे. सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 770 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात आले आहेत. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 5 हजार 981 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.