मुंबई- राज्यात आज कोरोनाचे २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १४ लाख १५ हजार ६७९ वर पोहोचला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के इतके आहे. राज्यात आज ८ हजार १४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन १ लाख ५८ हजार ८५२ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८३ लाख २७ हजार ४९३ नमुन्यांपैकी १६ लाख १७ हजार ६५८ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात २४ लाख ४७ हजार २९२ नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ३१२ नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, एकूण ४२ हजार ६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण १८० मृत्यूंपैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासातील, तर ३७ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत.
हेही वाचा- खडसेंचा प्रवेश ठरला, शुक्रवारी दोन वाजता राष्ट्रवादीत होणार प्रवेश