उरण : बोकडवीरा गावातील 75 वर्षीय ललिता कृष्णकांत ठाकूर (Lalita Krishnakant Thakur) या वृद्ध महिला शेजारी असणाऱ्या एका शाळेमध्ये काम करत होत्या. मंगळवारी त्या शाळेत आल्या नसल्याने चौकशी करण्यात आली. पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.
भाड्याने दिलेल्या खोलीत आढळला मृतदेह : आपल्या मालकीच्या घरात राहणाऱ्या ललिता ठाकूर यांनी घरातील दोन खोल्या भाड्याने दिल्या आहेत. यातील एका खोलीमध्ये बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून (Dead body found in rented room) आला आहे. दरम्यान मारेकऱ्याने खोलीला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला आहे. पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. हा खून कशासाठी केला (75 year old woman murdered in Uran) असावा याचाही मागोवा पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
डाॅग्स स्काॅड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमला बोलावले : खून झालेल्या महिलेचा मृतदेह तिच्या खोलीत नसून, भाड्याने दिलेल्या खोलीत कसा? त्याचप्रमाणे मृतदेह बांधण्यात का आला? बाहेरून कुलूप लावून पळण्यामागचा उद्देश काय? या सर्व प्रश्नावर पोलीस उत्तर शोधत असून, डॉग्स्कोडा आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.