ETV Bharat / state

Christmas Tree : तब्बल 70 फुटांचा ख्रिसमस ट्री; बहिणीला दिलेलं वचन पाळत आजही करतात खास रोषणाई

मुंबई एका व्यक्तीकडे तब्बल 70 फुटांचा क्रिसमस ट्री ( 70 foot Christmas Tree ) आहे. तो नाताळयाच्या दरम्यान सजवला जातो. आणि तो 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत रोषणाईने सजलेला ( Christmas Tree Stand Till January 26 Republic Day )असतो. त्याशिवाय या झाडाशी आणि बहिणीवर असलेल्या प्रेमाची ती निशाणी आहे.

author img

By

Published : Dec 22, 2022, 1:03 PM IST

Christmas Tree
70 फुटांचा ख्रिसमस ट्री
70 फुटांचा ख्रिसमस ट्री

मुंबई : ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून थाटामाटात साजरा करतात. जेव्हा आपण ख्रिसमसचा विचार करतो तेव्हा पहिल्या दोन गोष्टी लक्षात येतात सांता आणि दुसरे ख्रिसमस ट्री. या दिवशी ठिकठिकाणी ख्रिसमस ट्रीला सजवले जाते. याच दिवसात अनेकांची ख्रिसमस ट्री सजवण्याची स्पर्धा असते. प्रत्येकाला आपला ख्रिसमस ट्री हा अधिक आकर्षक दिसावा असे वाटत असते. मात्र, मुंबईतील एका व्यक्तीकडे तब्बल 70 फुटांचा ख्रिसमस ट्री ( 70 foot Christmas tree ) आहे आणि हा डगलस ट्री दरवर्षी दिवाळीपासून ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत ( Christmas Tree Stand Till January 26 Republic Day ) विविध रंगाच्या रोषणाईने सजलेला असतो.

लहानपणी लावले झाड : हा तब्बल सत्तर फुटांचा क्रिसमस ट्री आहे. वरळी येथे राहणाऱ्या डगलस सॅलदाना यांच्या घराबाहेर. ईटीव्हीशी बोलताना डकलस म्हणाले की, "आमचे एकत्र कुटुंब होते. इथे एक व्यक्ती राहायचा त्यांच्याकडे हा ख्रिसमस ट्री होता. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. त्यांनी त्यांची बाग साफ केली त्यावेळी त्यांनी हा ख्रिसमस ट्री कोणालातरी द्यायचा म्हणून काढून ठेवला होता. माझे वडील हे झाड आमच्या घरी घेऊन आले. तेव्हापासून मी आणि माझी बहीण याची काळजी घेत होतो. आम्ही रोज या झाडाला पाणी घालायचो, त्याची देखभाल करायचो आणि क्रिसमसच्या दिवसात या झाडाला उत्तम सजवायचे असा आमचा नित्यक्रम होता."

बहिणीचे निधन : पुढे बोलताना डगलस सॅलदाना म्हणाले की, "सर्व काही सुरळीत सुरू होते. बहीण मोठी झाली आणि ती परदेशात गेली. त्याचवेळी तिला कॅन्सर असल्याचे आमच्या लक्षात आले. आणि कॅन्सरमध्येच माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. माझ्या बहिणीची शेवटची इच्छा तिने मला बोलून दाखवली. माझी बहीण म्हणाली होती आपण ज्या क्रिसमस ट्रीची दरवर्षी ख्रिसमसला सजावट करतो रोशनी करतो मी नसताना देखील दादा तू ख्रिसमस ट्री नेहमी ( Christmas Tree Sign of Sisters Love ) सजवायचा. मला स्वर्गातून देखील आपले हे झाड दिसले पाहिजे अशी त्याला रोषणाई कर. माझ्या बहिणीच्या निधनानंतर मी दरवर्षी ख्रिसमसला इथे रोषणाई करतो."

दिवाळी ते प्रजासत्ताक दिन झाले सजलेले असते : "मी माझ्या बहिणीला दिलेले वचन दरवर्षी पूर्ण करतो. दरवर्षी विद्युत रोषणाईमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला आम्ही फक्त नाताळच्या दिवसात हे झाड सजवायचो. मात्र, आता आम्ही दिवाळीपासूनच हे झाड सजवायला सुरुवात करतो. दिवाळीत थोडी रोषणाई करतो त्यानंतर आणखी थोडी मेहनत घेऊन नाताळमध्ये पूर्ण रोशनी करतो आणि ही रोषणाई 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापर्यंत असते. प्रजासत्ताक दिनाला हे झाड आपल्या देशाच्या झेंड्याच्या रंगात म्हणजेच तिरंग्याच्या रंगात सजलेले असते." अशी माहिती डकलस यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.