मुंबई: डीआरआय अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून युगांडा मधून भारतात आलेल्या ब्रँडन सुल्पिसिअस मिगाडे (38) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांना निदर्शनास आले की आरोपीजवळ ड्रग्स आहे आरोपीला वारंवार विचारले असता त्याने नकार दिला त्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला जेजे रुग्णालयात दाखल केले तसेच त्याची सोनोग्राफी करण्यात आली त्यानंतर आरोपीच्या पोटात ड्रग्सच्या कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी मूळचा युगांडाचा नागरिक आहे. त्याला 13 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. तो इथोपियावरून मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या 70 कॅप्सूल (70 capsules of cocaine) बाहेर काढल्या आहेत ज्याची अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील किंमत 7 कोटी (worth Rs 7 crore) रुपयेआहे.