ETV Bharat / state

Mumbai Accident News : भरधाव कारच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू - अपघाताची दुर्दैवी बातमी

Mumbai Accident News : मुंबई परिसरातून अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पूजा करून ऑटोरिक्षाने घरी येत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला (65 Year Old Man Death In Accident) आहे.

Accident News
वृद्ध पुरुषाचा अपघाती मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 10:04 PM IST

मुंबई Mumbai Accident News : गोवंडी येथील पांजरापोळजवळ निलम जंक्शन सिंग्नल येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (65 Year Old Man Death In Accident) झाला आहे. कार चालकानं पांजरापोळ सर्कल येथे ट्रॅफिक सिग्नल तोडला आणि घटनेच्या वेळी तो ताशी 70 किलोमीटरहून अधिक वेगाने जात होता. वसईतील आशिष केंद्रात कुटुंबातील सदस्य त्यांच्या अर्धांगवायू झालेल्या मुलासाठी पूजा करून घरी परतत होते. त्यावेळी हा दुर्वैवी अपघात घडला.

रुग्णालयात झाला मृत्यू : शताब्दी रुग्णालयात तैनात पोलीस हवालदार सानप यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात (Govandi Police Station) माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. सखाराम किशन भदरगे (वय 65) असं अपघात झालेल्या वृद्धाचं नाव आहे. मंगळवारी रात्री 9:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले, जेथे त्यांनी भदरगे यांचा मुलगा रमेश (वय 45) याच्या घटनेबाबत जबाब नोंदवला. पेशाने ड्रायव्हर असलेल्या रमेश यांनी आरोप केला आहे की, कंबरेखालील अर्धांगवायू असलेल्या त्यांच्या २४ वर्षीय मुलावर अनेक वैद्यकीय उपचार केले परंतु त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही.

चालका विरोधात गुन्हा दाखल : जोरदार धडक बसल्याने भदरगे ऑटोतून बाहेर फेकले गेले आणि काही अंतरावर पडले. त्याच्या डोक्याला तसंच शरीराच्या इतर भागांसह त्याच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली. कुटुंबातील इतरांनाही दुखापत झाली आहे. परंतु ते गंभीर नव्हते, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. रस्त्याने जाणाऱ्यांनी त्यांना शताब्दी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अपघातानंतर मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास भदरगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश, त्याची पत्नी आणि मुलाची प्रकृती स्थिर आहे. रमेशच्या तक्रारीच्या आधारे, चालका विरोधात कलम 304 (अ) (रॅश आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल) 279 (रॅश ड्रायव्हिंग किंवा सार्वजनिक मार्गावर वाहन चालवणे), 338 (कृत्याने गंभीर दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -

  1. Doctors Accident Death: उतारावर अनियंत्रित कार झाडावर आदळली; दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू
  2. Bsf Jawan Hit By Train Died : महेंद्रगडमध्ये रेल्वेला धडकून बीएसएफ जवानाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
  3. राज्यात वाहन चालकांसाठी परतीची वेळ ठरतेय जीवघेणी! रात्री ६ ते ९ दरम्यान सर्वाधिक अपघाती मृत्यू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.