आज दिवसभरात -
- मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती
मुंबई - हवामान विभागाने येत्या 6 आणि 7 जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित यांच्या याचिकेवर सुनावणी मुंबई उच्च
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
- आज मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो
मुंबई - पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते
- ज्येष्ठ लेखक आणि नाटककार विजय तेंडुलकर यांची आज जयंती
हैदराबाद - विजय तेंडुलकर हे 20 व्या शतकातील, विशेषतः मराठी भाषेतील भारतातील सर्वात प्रभावशाली आणि प्रसिद्ध नाटककारांपैकी एक होते. आज (6 जानेवारी) विजय तेंडुलकर यांची जयंती आहे. तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली कारण ते गांधींच्या ब्रिटीशविरोधी भारत छोडो आंदोलनात सामील झाले होते.
- आज पहिली विनायक चतुर्थी
मुंबई - विनायक चतुर्थीचा उपवास कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. पौष महिन्यातील विनायक चतुर्थीला वरद चतुर्थी असेही म्हणतात. या वर्षातील ही पहिली विनायक चतुर्थी आहे.
- Xiaomi 11i, Xiaomi 11i Hypercharge हे मोबाईल आज होणार लाँच -
मुंबई - Xiaomi 11i, Xiaomi 11i हायपरचार्ज हे दोन्ही स्मार्टफोन 6 जानेवारी 2022 रोजी भारतीय मार्केटमध्ये दाखल होतील. यामध्ये यूजर्सना खास फीचर म्हणून 120w फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आणि कंपनीचा दावा आहे की, फास्ट चार्जिंग सपोर्टच्या मदतीने स्मार्टफोन 100% चार्ज होण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतील. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Xiaomi 11i सीरीजच्या लॉन्चिंग डेटसोबतच अनेक खास फीचर्सही समोर आले आहेत.
काल दिवसभरात -
मुंबई - राज्यात सध्या सरकार नाही, तर टोळीचे राज्य आहे. इतिहासातील सर्वात पळपुटे, डरपोक आणि खंडणीखोर असे हे सरकार आहे. या सरकारमध्ये विकास कामांसाठी कुणी भांडत नाही, तर टक्केवारीसाठी भांडतात, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) युवासेनेचे (Yuvasena) अड्डे बनवण्याचे षडयंत्र करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मुंबई - राज्यात मंगळवारी 18 हजार ( 18 Thousand Corona Cases ) रुग्ण 9 होते. गेल्या 24 तासांत सुमारे 8 हजार नव्या कोविड ( 8 Thousand New Covid Cases ) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बधितांचा आकडा 26 हजारपर्यंत ( Number of Corona Patients 26 Thousand ) पोहोचला आहे. तर ओमायक्रॉनचे 100 नवे रुग्ण ( 100 New Patients of Omicron ) सापडले आहेत.
मुंबई - आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ( Covid Spread In Maharashtra ) आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला ( Schools Closed Maharashtra ) आहे. आता अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थ सहाय्यक विद्यापीठ, तंत्रनिकेतन विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांचे वर्ग येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात ( Maharashtra College Closed ) आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher Technical Education Minister Uday Samant ) यांनी केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सामंत यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी वसुलीच्या आरोपात अटकेत आहेत. मुंबई विशेष सत्र न्यायालयात अनिल देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला ईडीने विरोध ( ED opposes Anil Deshmukh default bail ) दर्शवला. या संदर्भात आज बुधवारी (दि. 5) प्रतिज्ञापत्राद्वारे विशेष न्यायालयात विरोध करण्यात आला आहे.
नाशिक - इगतपुरी तालुक्यातील ( Accident Near Igatpuri Of Nashik ) मुंढेगावजवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन ( Teachers Car Accident ) धडकला. या अपघातात कारमधील जिल्हा परिषद शाळांचे 6 शिक्षक आणि शिक्षिका असल्याचे समजते. दुपारी साडेचार वाजता झालेल्या ह्या अपघातात 3 शिक्षक जागीच ठार ( 3 Teachers Died In Road Accident ) तर 3 शिक्षक, शिक्षिका गंभीर जखमी झाले आहेत.
- वाचा आजचे राशीभविष्य -
VIDEO : 06 January Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य