मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी राज्यातील तब्बल 5 हजार 947 शाळाची घंटा वाजली आहे. या शाळांमध्ये 4 लाख 16 हजार 599 विद्यार्थ्यानी हजेरी लावली. यात बहुतांश शाळा या विदर्भ आणि मराठवाडा भागातील आहे.
4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लावली हजेरी -
मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात 15 जून 2021 आणि विदर्भात 28 जून 2021 पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने पालकांसोबत ठराव करून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलै 2021 पासून सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली होती. त्यानुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी 5 हजार 947 शाळांची घंटा वाजली आहे. या शाळांमध्ये 4 लाख 16 हजार 599 विद्यार्थ्यानी हजेरी लावली.
25 जिल्ह्यामधील शाळा सुरू -
राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामध्ये तब्बल 5 हजार 947 शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक शाळा कोल्हापुरमध्ये 940, औरंगाबाद 631 आणि यवतमाळमध्ये 502 शाळा सुरू झाल्या. तर सर्वात कमी रत्नागिरीमध्ये चार तर सांगलीमध्ये 20 शाळांमध्ये वर्ग सुरू झाले. कोल्हापूरमधील 940 शाळांमध्ये 1 लाख 55 हजार 784 तर यवतमाळमधील 505 शाळांमध्ये 27 हजार 610 आणि औरंगाबादमध्ये 21 हजार 509 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे यामध्ये बहुतांश शाळा या विदर्भ आणि मराठवाडा भागातील आहेत.
हेही वाचा - आमिर-किरणचा संसार'मुक्त' डान्स, 'लाल सिंग चढ्ढा'च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - झाडू मारणारी सफाई कर्मचारी झाली प्रशासकीय अधिकारी; ही जिद्द पहाच!