ETV Bharat / state

पालिकेच्या 59 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू; वारसाला मदतीची मागणी - पावसाळ्यात कोरोना प्रसाराची भीती

मुंबई महापालिकेची कार्यालये, रुग्णालये, मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे, पाणी स्वच्छ करणारे केंद्र आदी ठिकाणी 1500 सुरक्षा रक्षक काम करतात. त्यापैकी 59 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वारसाला एक कोटींची मदत आणि पालिकेत नोकरी देण्याची मागणी केली आहे.

पालिकेच्या 59 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

author img

By

Published : May 21, 2020, 9:39 AM IST

मुंबई - राजधानी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकारांसह पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. पालिकेच्या सुरक्षा विभागातील 59 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका सुरक्षा रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला 1 कोटींची मदत आणि पालिकेत नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईत सुमारे 24 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आया, वॉर्ड बॉय, पालिकेचे सफाई कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आयएएस आयपीएस अधिकारी राहत असलेल्या इमारतीत कोरोना शिरला आहे.

पालिकेच्या 59 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
पालिकेच्या 59 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
मुंबई महापालिकेची कार्यालये, रुग्णालये, मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे, पाणी स्वच्छ करणारे केंद्र आदी ठिकाणी पालिकेचे 1500 सुरक्षा रक्षक काम करतात. त्यापैकी 59 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात एक उपसुरक्षा अधिकारी आणि तीन सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेचे सुरक्षा विभागाचे प्रमुख अधिकारी विनोद वाडकर यांनी दिली.

मदत आणि नोकरी द्या -

पालिका सेवेतील सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वारसांना 50 लाखांचा विमा, गट विम्याची रक्कम, महापौर निधीतून मदत अशी एकूण 1 कोटी रुपयांची मदत करावी. तसेच, त्यांच्या वारसाला पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, अशी मागणी मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‌ॅड. प्रकाश देवदास यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.