ETV Bharat / state

देशात 56 हजार 283 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 13 लाख पार - कोरोना रुग्ण मृत्यू संख्या भारत

भारतात गेल्या एक हफ्त्यापासून रोज 50 हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहे. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या 19 लाखांच्या पार गेली आहे.

कोरोना आढावा भारत
कोरोना आढावा भारत
author img

By

Published : Aug 7, 2020, 5:01 AM IST

हैदराबाद- भारताच्या सक्रिय आणि वर्गीकृत बहू-स्तरीय संस्थात्मक प्रतिसादामुळे देशातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल म्हटले.

विश्व स्वास्थ संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाचे क्षेत्रीय संचालक यांच्या व्हर्च्युअल बैठकीत सदस्य राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत मंत्री हर्षवर्धन बोलत होते. बैठकीत, विकसित देशांच्या तुलनेत उच्च लोकसंख्या घनता, कमी अपूर्णांक जीडीपी खर्च आणि प्रति व्यक्ती डॉक्टर आणि रुग्णालय बेडची उपलब्धता असतानाही कोरोनाचा उद्रेक कमी करता येतो, असे हर्षवर्धन म्हणाले.

दरम्यान, भारतात काल (6 जुलै) 56 हजार 283 कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ दिसून येत आहे. देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही 13 लाख 28 हजार 336 झाली आहे.

कोरोना आढावा भारत
कोरोना आढावा भारत

महाराष्ट्र- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून काल (6 ऑगस्ट) 11 हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. तसेच, आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर, सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नवी दिल्ली- काल प्रदेशात 1 हजार 299 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 531 झाली आहे. तसेच, गेल्या 24 तासात प्रदेशात कोरोनामुळे 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, मृतांची संख्या 4 हजार 59 झाली आहे.

बिहार- काल राज्यात 3 हजार 416 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 हजार 148 झाली आहे. तसेच, काल 1 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे, कोरोना मुक्त झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 43 हजार 820 आहे.

झारखंड- राज्यात 1 हजार 700 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकट्या राची शहरात 120 पोलीस कोरोनाबाधित असून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या कुटुंबांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी राचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी, जिल्ह्यातील पोलीस 15 दिवस काम करतील आणि 15 दिवस क्वारंटाईन राहतील, असा निर्णय घेतला आहे.

ईटीव्ही इम्पॅक्ट: उमर सिंघर यांचा झारखंड दौरा रद्द

झारखंड कॉग्रेसचे सहप्रभारी उमंग सिंघर यांच्या बाबतीत ईटीव्ही भारतच्या बातमीला यश आले आहे. आंतर राज्य क्वारंटाईन प्रोटोकॉल आणि उमंग सिंघर यांच्या राची, बेरमो आणि धनबाद येथील दौऱ्याबाबात ईटीव्ही भारतने प्रशासनाला धारेवर धरले होते व प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यावर, मोठा बदल घडला असून राची जिल्हा प्रशासनाने उमंग सिंघर यांना सदर ठिकाणांवर जाण्यास मज्जाव केला आहे.

याबाबत रांचीचे उपायुक्त छवी रंजन यांनी, सिंघर यांनी झारखंडला भेट देण्यासठी ऑनलाईन परवानगी मागितली होती, मात्र ते एका राजकीय पक्षाशी जुळलेले आहेत, याची कल्पना प्रशासनाला नव्हती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

राजस्थान- राज्यातील एक माजी मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भारतीय जनता पार्टीतील शीर्ष नेत्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. यात बिकानेर येथील भाजपचे अध्यक्ष अखिलेश प्रताप सिंह यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यात काल 539 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 48 हजार 384 झाली आहे. तसेच, मृतांची संख्या 753 वर पोहोचली आहे.

पंजाब- राज्यात काल 1 हजार 49 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20 हजार 891 झाली आहे. तसेच, काल 26 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या 517 झाली आहे.

ओडिशा- राज्यात काल 1 हजार 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40 हजार 717 झाली आहे. तसेच, काल 10 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या 235 झाली आहे.

उत्तराखंड- तुरुंगात कोरोनाचा संसर्ग कमी करणे, तेसेच तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी राज्य तुरुंग व्यवस्थापनाने काही कैद्यांना जामीन आणि परोल देण्याची मागणी राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाला केली आहे. जे कैदी समाजाला धोकादायक नसतील अशाच कैद्यांना जामीन किंवा परोल मिळणार आहे. राज्यात 100 कैद्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून सदर मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात काल 298 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 552 झाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये रुद्रपूरच्या महापौरांचा देखील समावेश आहे. तसेच, काल 4 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या 98 झाली आहे.

हेही वाचा- राम मंदिर भूमिपूजनावर पाकिस्तानची टीका; परराष्ट्र मंत्रालयानं दिले प्रत्युत्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.