मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. आज (मंगळवारी) मुंबईत 539 नवे रुग्ण आढळून आले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यात सर्वात कमी मृतांची आज नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
7 हजार 94 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज कोरोनाचे 539 नवे रुग्ण आढळून आले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 95 हजार 524 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 147 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 379 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 76 हजार 413 वर गेला आहे. सध्या मुंबईत 7 हजार 94 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत उद्योगांना टाळे लावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 363 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 363 दिवस, तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 225 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, 2 हजार 344 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 24 लाख 15 हजार 535 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या
१६ नोव्हेंबर - ४०९, १७ नोव्हेंबर - ५४१, १८ नोव्हेंबर - ८७१, १९ नोव्हेंबर - ९२४, २० नोव्हेंबर - १०३१, २१ नोव्हेंबर - १०९२, २२ नोव्हेंबर - ११३५, २३ नोव्हेंबर - ८००
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या
7 नोव्हेंबर 576 रुग्ण, 2 नोव्हेंबर 706 रुग्ण, 3 नोव्हेंबर 746 रुग्ण, 6 नोव्हेंबर 792 रुग्ण, 9 नोव्हेंबर 599 रुग्ण, 10 नोव्हेंबर 535 रुग्ण, 14 नोव्हेंबर 574 रुग्ण, 16 नोव्हेंबर 409 रुग्ण
हेही वाचा - बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात समिती गठीत - पणणमंत्री