ETV Bharat / state

राज्यात आज 522 नवीन कोरोनाबाधित रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 8590 वर - corona live maharashtra

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (सोमवारी) राज्यात 522 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 27, 2020, 8:39 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (सोमवारी) राज्यात 522 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे. तर ७ हजार २४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. राज्यात सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. तर ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना विरोधात उपचार करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (सोमवारी) मुंबईत दिली.

हेही वाचा - 'राज्यात पोलिसांसाठी विशेष आरोग्य कक्ष'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.