ETV Bharat / state

मुंबई कोरोना अपडेट : शनिवारी तब्बल 5 हजार 105 रुग्णांची कोरोनावर मात, नविन 2 हजार 211 रुग्णांची नोंद - mumbai corona total patients

मुंबईत आज (शनिवारी) 5 हजार 105 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याआधी 2 जुलैला 5 हजार 903 रुग्णांनी एकाच दिवशी मात केली होती.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Sep 19, 2020, 10:30 PM IST

मुंबई - राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, रुग्णसंख्या बरे होण्याचेही प्रमाण वाढत आहे. आज (शनिवारी) मुंबईत 5 हजार 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 2 हजार 211 नविन बाधितांची नोंद झाली आहे. तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 41 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत.

मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज शनिवारी मुंबईत कोरोनाच्या 2211 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 82 हजारावर गेला आहे. तर आज एकाच दिवशी 5105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याआधी 2 जुलैला 5 हजार 903 रुग्णांनी एकाच दिवशी मात केली होती.

मुंबईमधील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 82 हजार 77 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 422 इतकी झाली आहे. तर एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा संख्या 1 लाख 42 हजार 769 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत 30 हजार 512 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.4 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवस तर सरासरी दर 1.24 टक्के आहे.

सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 572 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 968 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 90 हजार 940 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.