मुंबई - बुधवारी ( दि. 26 जानेवारी ) प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) साजरा होणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पोलिसांना गौरविण्यात येते. या पोलीस पदकांची आज ( दि. 25 जानेवारी) घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 7 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 40 पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय ( Central Home Ministry ) दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक ( Police Medal ) जाहीर करते. यावर्षी एकूण 939 पोलीस पदक जाहीर झाली असून 88 पोलिसांना राष्ट्रपती पदक ( President's Police Medal ), 189 पोलिसांना पोलीस शौर्य पदक ( Award of Police Medal for Gallantry ) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक ( Distinguished Service and Police Medal ) आणि दोन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 51 पदक मिळाली आहेत. देशातील ८८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- चौघांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक -
- विनय कोरगावकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक, जुने कस्टम हाऊस, फोर्ट मुंबई
- प्रल्हाद खाडे, कमांडंट राज्य राखीव पोलीस दल, गट ६, धुळे
- चंद्रकांत गुंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड, पुणे
- अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड
- राज्यातील एकूण सात पोलिसांना 'पोलीस शौर्य पदक'
- गोपाळ उसेंडी, सहायक पोलीस उपनिरीक्षक
- महेंद्र कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
- संजय बकमवार, पोलीस हवालदार
- भरत नागरे, पोलीस उपनिरीक्षक
- दिवाकर नारोटे, नाईक पोलीस हवालदार
- निलेश्वर पड, नाईक पोलीस हवालदार
- संतोष पोटवी, पोलीस हवालदार
- राज्यातील एकूण ४० पोलिसांना 'पोलीस पदक'
- राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई
- चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालय
- सीताराम जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे
- भारत हुंबे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, परभणी
- गजानन भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर
- अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक, आयुक्ताल, नवी मुंबई
- जितेंद्र मिसाळ, पोलीस निरीक्षक, आयुक्तालय, मुंबई
- विद्याशंकर मिश्रा, पोलीस निरीक्षक, एस.पी.सी.आय.डी., नागपूर
- जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, आयुक्तालय, नवी मुंबई
- सुरेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक, औरंगाबाद शहर
- प्रमोद लोखंडे, सहायक कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल, गट ४, नागपूर
- मिलिंद नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक, मुख्य गुप्तचर अधिकारी, एसआयडी, मुंबई
- शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक. मुंबई शहर
- रघुनाथ निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, मुंबई शहर
- संजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर
- राष्ट्रपाल सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर
- प्रकाश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर
- नंदकिशोर सरफरे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
- राजेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी, परभणी
- शिवाजी देसाई, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
- राजाराम भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी, जळगाव
- देवेंद्र बागी, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
- संभाजी बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सातारा
- बबन शिंदे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी., कोल्हापूर
- पांडुरंग वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर
- विजय भोग, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर
- पांडुरंग निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, आयुक्तालय, नवी मुंबई
- राजेंद्र चव्हाण सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
- अनिल भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा
- संजय तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर
- रविकांत बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ
- अल्ताफ शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर, अहमदनगर
- सत्यनारायण नाईक, सहायक पोलीस निरीक्षक, मुंबई शहर
- बस्तर मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली
- काशिनाथ उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे
- अमरसिंग भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी, कोल्हापूर
- आनंदराव कुंभार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी सांगली
- मधुकर पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर
- सुरेश वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर
- लहू राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई शहर