ETV Bharat / state

मुंबईकरांना खुशखबर! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 50 टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे तलावांच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पाण्याने ओसांडून वाहणारे तलावाचे दृष्य
author img

By

Published : Jul 18, 2019, 1:33 PM IST

मुंबई - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने तलावांचा पाणीसाठा वाढला आहे. हा पाणीसाठा शहराला २०१ दिवस पुरेल इतका झाला आहे. असाच चांगला पाऊस पडत राहिल्यास शहराला एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा लवकरच तलावांमध्ये जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या जल विभागाने व्यक्त केली आहे.

पाण्याने ओसांडून वाहणारे तलावाचे दृष्य

गेल्या वर्षी परतीचा पाऊस न आल्याने शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर महापलिकेतर्फे नोव्हेंबर महिन्यापासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. ही पाणीकपात आजही लागू आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने या तलावांच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार तलावांमध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला २०१ दिवस पुरणार इतका आहे. असाच जोरदार पाऊस सुरू राहिल्यास शहराला एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा या ७ तलांवमध्ये जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या जल विभागाने केली आहे.

...इतका झाला पाणीसाठा

अप्पर वैतरणामध्ये १९ हजार १४०, मोडक सागरमध्ये १ लाख ७ हजार ५४७, तानसामध्ये १ लाख ४ हजार ०४३, मध्य वैतरणामध्ये १ लाख ३६ हजार ७४३, भातसामध्ये ३ लाख ३३ हजार ५१५, विहारामध्ये १६ हजार, तुलशीमध्ये ८ हजार ४९ अशा सात तलावांमध्ये एकूण ७ लाख ३५ हजार ०५२ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तसेच १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजतापासून तुलशी तलाव भरून वाहू लागले आहे.

Intro:मुंबई -
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणी साठा वाढत आहे. आज सकाळी 6 वाजताच्या आकडेवारीनुसार तलावांमध्ये सध्या 50 टक्के पाणीसाठा असून मुंबईकरांना 201 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास मुंबईकरांना वर्षभर लागेल इतका पाणीसाठा लवकरच तलावांमध्ये जमा होईल अशी अपेक्षा महापालिकेच्या जल विभागाने व्यक्त केली आहे. Body:मुंबईत गेल्या वर्षी परतीचा पाऊस न आल्याने मुंबईवर पाणीसंकट उभे राहिले. नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. ही पाणीकपात आजही लागू आहे. त्यात समाधानाची बाब म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात पाऊस समाधानकारक पडत असल्याने पाण्याच्या पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे.

अप्पर वैतरणामध्ये 19 हजार 140, मोडक सागरमध्ये 1लाख 7 हजार 547, तानसामध्ये 1 लाख 4 हजार 043, मध्य वैतरणामध्ये 1 लाख 36 हजार 743, भातसामध्ये 3 लक्ष 33 हजार 515, विहारामध्ये 16 हजार 8, तुलशीमध्ये 8 हजार 49 अशा सात तलावांमध्ये एकूण 7 लाख 35 हजार 052 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तसेच तुलशी तलाव 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या महिनाभरात मुंबईकरांना लागणारा वर्षभराचा पाणीसाठा तलावात जमा होईल अशी अपेक्षा पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.

तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे vis पाठवत आहे...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.