मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. कोट्यवधी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. एक ट्विट करत पाटील यांनी ही माहिती दिली.
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही.@mybmc
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही.@mybmc
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 3, 2020बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही.@mybmc
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 3, 2020
मुंबईला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते. मात्र, आता वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.