मुबई : रेल्वेचे ट्रॅक, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आदीच्या परिरक्षणासाठी वेळोवेळी मेगा ब्लॉक घेतला जातो. भिवपुरी आणि कर्जत स्थानकांदरम्यान १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मेगाब्लॉक घेतला जात आहे. याची माहिती घेवून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबतची माहिती देण्यात आली. परिणामी मुंबईकरांनी त्यांच्या सोयीनुसार वाहनांचा वापर करत गंतव्यस्थानापर्यंत पोहोचावेल. बस, रिक्षा, दुचाकी, कार, टॅक्सीचा वापर करू शकता.
ट्रेनच्या वेळेत बदल : मध्य रेल्वेवर १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.५० पर्यंत भिवपुरी आणि कर्जत स्थानकांदरम्यान डाउन मार्गावर बीसीएम मशीनच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान सर्व ५ दिवस उपनगरीय रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून कर्जतला १२.२४ वाजता पोहोचू शकेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून काही लोकल बदलापूरपर्यंत जातील. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी २.३३ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपासून चालविण्यात येईल.
ब्लॉकची माहिती घेवून प्रवास करा : १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान रात्र कालीन मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी बहुतेक ट्रेन बंद असतात. याचा विचार करून हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार नाही. केवळ मध्यरात्री कामावरून घरी जाणाऱ्या आणि पहाटे कामावर येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होणार आहे. मेगा ब्लॉकची दखल घेवून प्रवाशांनी आपला प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या ब्लॉक दरम्यान प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.
रेल्वेने ७० लाख प्रवाशांचा प्रवास : मुंबईत रेल्वे आणि बेस्टला जीवनवाहिनी बोलले जाते. मुंबईत कुठेही लवकर पोहचता यावे म्हणून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तीन मार्गावर रोज तब्बल ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. कामावर जाणारे, फिरण्यासाठी बाहेर पडणारे लाखो प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी रेल्वेचे ट्रॅक, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आदीच्या परिरक्षणासाठी मेगा ब्लॉक घेतला जातो.
हेही वाचा : Air India Boeing Deal : एअर इंडिया-बोईंगच्या करारामुळे भारत व अमेरिकेतील व्यावसायिक भागीदारी मजबूत होईल