ETV Bharat / state

नायर रुग्णालयात 408 कोरोनाग्रस्त मातांनी दिला 412 कोरोना निगेटिव्ह बाळांना जन्म

author img

By

Published : Jul 4, 2020, 10:22 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोना विषाणूने बाधित झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत 408 मातांनी 412 बाळांना जन्म दिला आहे.

Nair hospital
नायर रुग्णालय

मुंबई - महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोना विषाणूने बाधित झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत 408 मातांनी 412 बाळांना जन्म दिला आहे. त्यात सात जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मातांनी कोरोना निगेटिव्ह असलेल्या बाळांना जन्म दिला आहे. या 408 पैकी 370 प्रसूती झालेल्या मातांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती नायर रुग्णालयातून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पालिकेने नायर रुग्णालयात प्रसूतीसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात 14 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 408 कोरोना पॉझिटिव्ह माता दाखल झाल्या होत्या. त्यांनी 412 बाळांना जन्म दिला आहे. प्रसुती होणाऱ्या महिला कोरोनाग्रस्त असल्याने जन्म दिलेल्या बाळांची कोरोना चाचणी केली गेली. या चाचणीत सर्व बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सर्व बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने ही एक दिलासादायक बाब असल्याचे नायर रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत वयोवृद्ध, गर्भवती महिला, दिर्घ आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटीव्ह आल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयात नायर रुग्णालया एवढ्या कोरोना निगेटीव्ह बाळांचा जन्म झाला नसल्याचा दावा नायर रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

बाळाला हाताळताना झाली कोरोना पॉझिटिव्ह -

408 मातांनी 412 बाळांना जन्म दिला. त्यात सात जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. त्यात आधी 15 बालके कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात ती बालके कोरोना निगेटीव्ह आली. त्या बाळांना हाताळल्यानंतर बालकांना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर उपचार केल्यावर ती सर्व बालके डिस्चार्ज देण्याआधी निगेटीव्ह आली आहेत. मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटीव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा दुध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नाही, असे रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. सुषमा मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - बांधकाम क्षेत्राला कोरोनाचा फटका, ३ महिन्यात एमएमआरमध्ये एकही नवीन घर नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.