हैदराबाद- भारत आणि जगातील इतर कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना कोविड-19 लसीचे 10 कोटी डोस पुरविण्यासाठी भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने इंटरनॅशनल वॅक्सीन अलायंस गावी आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. अशी माहिती काल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली.
दरम्यान, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 20 लांखाच्या पार गेली आहे. देशात 20 लाख 35 हजार 337 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. देशात काल (7 ऑगस्ट) 41 हजार 585 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
महाराष्ट्र- राज्यात काल (7 ऑगस्ट) नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या थोडी अधिक असून काल देखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिल्ली- जेव्हा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, प्लाझ्मा थेरेपीने कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका कमी होणार नाही. त्याचा काही खास फायदा झाला नाही. याचा अर्थ प्लाझ्मा थेरेपी ही कुचकामी आहे, असा त्यांचा अर्थ नव्हता, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन म्हणाले.
उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेश येथील एक पोलीस निरीक्षक, जो गेल्या 8 दिवसात दोनदा कोरोना निगेटिव्ह आला होता, त्याचा बुधवारी (5 ऑगस्ट) लखनऊ रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, या पोलिसाला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्या काही दिवसानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह होता, अशी माहिती मिळाली आहे.
पंजाब- लुधियाना, जालंधर आणि पटियाला येथे आजपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश मुख्मंत्री अमरिंदर सिंह यांनी काल दिले होते. त्यानुसार आजपासून रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 पर्यंत सदर तिन्ही शहरांमध्ये संचारबंदी असणार आहे.
दरम्यान, भारतीय हॉकी संघाचे खेळाडू कोरोनाच्या सपाट्यात सापडले आहे. संघाचे कर्णधार मनप्रित सिंह आणि इतर 4 खेळाडूंना कोरोना असल्याचे समोर आले आहे. या सर्व खेळाडूंना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्य प्रदेश- माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार हर्ष पोद्दार यांना कोरोना झाला आहे. आजपर्यंत राज्यात 10 पेक्षा अधिक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल राज्यात 830 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 36 हजार 564 झाली आहे.
ओडिशा- कोरोनाला अटकाव करण्यासाठी ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन तर्फे विविध मायनिंग झोन्समध्ये 3 कोविड केअर होम्सची स्थापना करण्यात आली आहे.
तेलंगणा- हैदराबाद येथील 182 पोलीस कर्मचारी जे कोरोनामुक्त झाले आहेत. ते सर्व काल नौकरीवर रुजू झाले आहेत.
हेही वाचा- महावितरणकडून 20 हजार कोटींची लूट; भाजपने केला 'महावितरणचा काळाचिठ्ठा' प्रकाशित