मुंबई - वरळी कोळीवाडा परिसरात कोरोना विषाणूचे 4 संशयित रुग्ण आढळल्याने हा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. पोलिसांकडून याठिकाणी त्यासंबंधी उद्घोषणा केली जात असून कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले असल्याचं सांगण्यात येत आहे.
या 4 रुग्णांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे चारही संशयित रुग्ण 50 वर्षांचे पुढील असून या लोकांनी आतापर्यंत परदेशात कोणताही प्रवास केला नसल्याची माहिती आहे.