ETV Bharat / state

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर एका मिनिटाला उतरतात ३५ विमाने; वाचा खास रिपोर्ट

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, जागतिक दर्जाचे शहर आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक येतात. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ म्हणून ओळखले जाते. या विमानतळावर एका मिनिटाला ३५ विमाने उतरतात. यामधून सुमारे ५२०० प्रवासी विमानतळावर उतरतात.

author img

By

Published : Mar 9, 2023, 10:04 PM IST

Mumbai Airport
Mumbai Airport

मुंबई : मुंबई विमानतळावर दिवसाला म्हणजेच २४ तासात ८५७ विमाने उतरतात. त्यामधून सुमारे सव्वा लाख प्रवासी विमानतळावर उतरतात. शाळांना सुट्टीच्या दिवशी म्हणजे उन्हाळी, दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टी दरम्यान प्रवासाची संख्या वाढलेली असते. अशीच वाढ गेल्यावर्षी डिसेंबर दरम्यान दिसून आली होती. १० डिसेंबर रोजी दिवसभरात ८९२ विमानतळातून १ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. १ लाख ११ हजार ४४१ देशांतर्गत तर ३९ हजार ५४७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास केला होता. मुंबई विमानतळावर २०१९ मध्ये पहिल्यांदा २४ तासात दीड लाख प्रवासी हाताळले होते.

सर्वाधिक प्रवासी या दिवशी : मुंबई विमानतळावर २२ डिसेंबर २०१७ रोजी १ लाख ५२ हजार ५६२ प्रवासी उतरले होते. २१ डिसेंबर २०१८ रोजी १ लाख ५६ हजार ३२९ प्रवासी तर २० डिसेंबर २०१९ रोजी १ लाख ५० हजार २७९ प्रवासी उतरले होते.

विमानतळावर आधीच पोहचण्याच्या सूचना : मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असल्याने, प्रवाशांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. या रांगा कमी करण्यासाठी हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आढावा घेतला होता. विमानतळांवर होणारा खोळंबा, विमानवाहतुकीची कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांचे नियोजन करणारा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर साडेतीन तास तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अडीच तास आधी पोहण्याच्या सूचना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने केल्या आहेत.

बोर्डिंग पास तपासणीसाठी 2D बारकोड रीडर : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर रोज सुमारे ८५० विमाने येतात, त्यामधून दीड लाख प्रवासी दिवसाला तर ४८ दशलक्ष प्रवासी वर्षाला प्रवास करतात. प्रवाशांची सुरक्षा तपासणी, तिकीट तसेच बोर्डिंग पास तपासणी केली जाते. बोर्डिंग पास मॅन्युअली तपासले जात होते. त्यासाठी वेळ लागत होता. हा वेळ कमी करण्यासाठी टर्मिन १ व २ वर बोर्डिंग पास स्कॅन करण्यासाठी 2D बारकोड रीडर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : हे मळभ नक्की दूर होईल! सत्ता येणार; राज ठाकरेंचा आत्मविश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.