मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळून आले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही गेल्या दहा महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - अर्थसंकल्प २०२१ : ..तर नागरिकांकडे आणखीन पैसा राहिला असता - अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 328 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 9 हजार 297 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 359 वर पोहचला आहे. 460 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 91 हजार 373 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 646 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 564 दिवस
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 564 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 192 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 2 हजार 22 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 28 लाख 15 हजार 467 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबर 2020 ला 576, 10 नोव्हेंबर 2020 ला 535, 16 नोव्हेंबर 2020 ला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, तर 26 जानेवारीला 342 म्हणजेच, सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - केंद्राच्या अर्थसंकल्पात नवीन कोणतेही कर नाही - जयस्वाल