ETV Bharat / state

परतीच्या पावसाचा ३२५ तालुक्यांना फटका, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - मुख्यमंत्री - तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३२५ तालुक्यांमध्ये या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आम्ही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 1, 2019, 3:20 PM IST

Updated : Nov 1, 2019, 4:33 PM IST

मुंबई - ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३२५ तालुक्यांमध्ये या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आम्ही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूर, तूर, ज्वारी, मका, द्राक्ष अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावला आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पावसाने नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोकण विभागात ४६ तालुक्यात ९७००० हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये १६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागात - ५१ तालुके बाधीत झाले असून, १ लाख ३६ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. औरंगाबादमध्ये विभागात ७२ तालुक्यामध्ये २२ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधीत झाली आहे. अमरावती विभागात ५६ तालुके बाधीत झाले असून, १२ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर विभागात ४८ तालुके बाधीत झाले असून, ४० हजार हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधीक फटका

जवळपास १८ ते १९ लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. बाजरी २ लाख हेक्टर, ५ लाख हेक्टरवर मक्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी, आमदारांनी शेतकऱ्यांच्या भेटी घ्याव्यात

प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारने हा विषय गांभीर्याने हाताळायचे ठरवले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Intro:Body:

मुंबई -  ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३२५ तालुक्यांमध्ये या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आम्ही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूर, तूर, ज्वारी, मका, द्राक्ष अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावला आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कोकण विभागात ४६ तालुक्यात ९७००० हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये १६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागात - ५१ तालुके बधीत झाले असून, १ लाख ३६ हजार हेक्टरील पिकाचे नुकसान झाले आहे. औरंगाबादमध्ये विभागात ७२ तालुक्यामध्ये २२ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधीत झाली आहे. अमरावती विभागात ५६ तालुके बधीत झाले असून, १२ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर विभागात ४८ तालुके बाधीत झाले असून, ४० हजार हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधीक फटका

जवळपास १८ ते १९ लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. बाजरी २ लाख हेक्टर, ५ लाख हेक्टरवर मकेच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी, आमदारांनी शेतकऱ्यांच्या भेटी घ्याव्यात

प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारने हा विषय गांभीर्याने हाताळायचे ठरवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Nov 1, 2019, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.