ETV Bharat / state

मुंबईत ३ वर्षीय चिमुकला पडला उघड्या गटारात, बघा विचलित करणारा VIDEO

गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरमध्ये एक 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात पडल्याची घटना घडली आहे.

author img

By

Published : Jul 11, 2019, 1:13 AM IST

Updated : Jul 11, 2019, 12:00 PM IST

मुंबईमध्ये तीन वर्षीय चिमुकला पडला नाल्यात, बचावकार्य सुरू

मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरमध्ये एक 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेला 9 तास झाले असून अद्याप बचाव कार्य सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. दिव्यांश सिंह असे त्या मुलाचे नाव आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ज्या नाल्यात मुलगा पडला तो नाला पुढे जाऊन मोठ्या नाल्याला मिळतो. सध्या सर्व नाले उघडले असून सर्वत्र शोधमोहीम सुरू आहे.

Intro:मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगर नाल्यात एक 3 वर्षांचा मुलगा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.Body:घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.Conclusion:घटनास्थळी मोठया प्रमाणात नागरिक जमले असून गेले 2 तास बचावकार्य सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
Last Updated : Jul 11, 2019, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.