ETV Bharat / state

विक्रोळीत रिक्षाचालकास ३ अल्पवयीन मुलांकडून मारहाण - रिक्षाचालकास मारहाण

रिक्षाचालकाने दुचाकीस धडक दिल्याने ३ अल्पवयीन मुलांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तीनही मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

विक्रोळीत रिक्षाचालकास ३ अल्पवयीन मुलाकडून मारहाण
author img

By

Published : Aug 22, 2019, 9:29 AM IST

मुंबई - विक्रोळी येथे एका मुलाच्या ताब्यातील दुचाकीस रिक्षाचा धक्का लागल्याने ३ अल्पवयीन मुलांनी रिक्षाचालकास मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. दरम्यान, काही वेळाने मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

रिक्षाचालक अझरुद्दीन जमिरहुल कुरेशी हे भांडुप दिशेला पूर्व द्रुतगती मार्गावरून मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान एक भाडे घेऊन जात होते. याचवेळी कांजूरगाव बेस्ट बस थांब्यासमोरून होंडा डिओ या दुचाकीवरून ३ अल्पवयीन मुले जात होती. दरम्यान, यावेळी रिक्षाचालकाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे या मुलांनी मारहाण करत विशिष्ट जातीवरून शिवीगाळ केली, असा आरोप रिक्षाचालकाने केला आहे.

यासंदर्भात रिक्षाचालकाने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणानंतर रिक्षाचालकाने काही राजकीय पक्षाच्या कार्यालयात जावून घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. तसेच मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असून काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यामुळे दुपारनंतर या प्रकरणाच्या तणावात भर पडली होती.

याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तीनही आरोपी मुलांना शोधून पोलीस ठाण्यात आणले. पोलीस तपासात या मुलांनी स्कूटरला रिक्षाचालकाने धडक दिली. त्यामुळे आम्ही खाली पडलो. तेव्हा रिक्षाचालकानेच आम्हाला मारहाण केली. यानंतर आम्ही रागात रिक्षाचालकास हातानी मारहाण केल्याची कबुली दिली.

या प्रकरणाला काहींनी राजकीय वळण दिले होते. मात्र, पोलीस तपासात वेगळीच बाजू येत असल्याने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून आणि अल्पवयीन मुलांच्या जबाबाची पडताळणी करून विक्रोळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Intro:विक्रोळीत रिक्षाचालकास तीन अल्पवयीन मुलाकडून मारहाण

घाटकोपर येथून पूर्व द्रुतगती मार्गावरून एक रिक्षा भांडुप दिशेला जात होती. यावेळी विक्रोळी येथे मुलाच्या ताब्यातील दुचाकीस धक्का लागल्याने 3 अल्पवयीन मुलांनी एका रिक्षाचालकास हातानी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी रिक्षाचालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी करून काही वेळानी मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेBody:विक्रोळीत रिक्षाचालकास तीन अल्पवयीन मुलाकडून मारहाण

घाटकोपर येथून पूर्व द्रुतगती मार्गावरून एक रिक्षा भांडुप दिशेला जात होती. यावेळी विक्रोळी येथे मुलाच्या ताब्यातील दुचाकीस धक्का लागल्याने 3 अल्पवयीन मुलांनी एका रिक्षाचालकास हातानी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी रिक्षाचालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी करून काही वेळानी मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

रिक्षाचालक अझरुद्दीन जमिरहुल कुरेशी हे भांडुप दिशेला पूर्व द्रुतगती मार्गावरून मंगळवारी रात्री 10 30 वाजेच्या दरम्यान एक भाडे घेऊन जात होते.रिक्षा कांजूरगाव बेस्ट बस थांब्यासमोर आल्यानंतर होंडा डिओ स्कूटर वरून 3 अल्पवयीन मुले जात होती. या मुलांनी मला मारहाण करत विशिष्ट जातीवरून शिवीगाळ केली असा आरोप रिक्षाचालकानी केला आहे. रिक्षाचालकानी याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली . यादरम्यान रिक्षाचालक काल काही राजकीय पक्षाच्या कार्यालयात जावून मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असून मला काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने दुपारनंतर या प्रकरणामुळे तणावात भर पढली होती.

याप्रकरणी विक्रोळी पोलिसानी तात्काळ गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपी मुलांना शोधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस तपासात या मुलांनी स्कूटरला रिक्षाचालकांनी धडक दिली आणि आम्ही खाली पडलो तेंव्हा आम्हालाच रिक्षाचालकानी मारहाण केली यानंतर आम्ही रागात रिक्षाचालकास हातानी मारहाण केल्याची कबुली दिली. या प्रकरणाला काहींनी राजकीय वळण दिले होते.मात्र पोलीस तपासात वेगळीच बाजू येत असल्याने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलिसाकडून आवाहन करण्यात आले आहे.
रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून आणि अल्पवयीन मुलाच्या जबाबाची पडताळणी करून विक्रोळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.