ETV Bharat / state

Mumbai Crime News: ग्रँड रोड येथील हल्ल्यात तिघांचा खून पूर्वनियोजित, १२ दिवसापूर्वीच आरोपीने केली तयारी - चाकूने प्राणघातक हल्ला

पन्नास दिवसांपूर्वी दोन महिन्यांपूर्वी पत्नीसह मुले सोडून गेल्याच्या मानसिक नैराश्यातून आणि आपल्या कुटुंबीयांना भडकवल्याच्या संशयातून चेतन गाला या व्यक्तीने त्याच्या शेजारी राहणार्‍या मिस्त्री या वयोवृद्ध दांपत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन या चाळीत घडली. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai Crime News
ग्रँड रोड येथील हल्ला
author img

By

Published : Mar 26, 2023, 9:04 AM IST

मुंबई : मागील आठवड्यात बिर्याणीच्या वादातून चाकू हल्ल्याची घटना घडली होती. ग्रँड रोड येथील या हल्ल्यात जयेंद्रभाई मिस्त्री ( वय ७७) आणि इलाबेन जयेंद्रभाई मिस्त्री (वय ७०) या वयोवृद्ध पती-पत्नीसह जेनिल ब्रम्हभट्ट (वय १८) वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. ईलाबेन यांच्या शरीरावर आरोपी चेतन गाला याने 17 वार केले आहेत. डीबी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन गाला याने बारा दिवसांपूर्वीच बारा इंचाचा चाकू खरेदी केला होता, असे त्याने पोलीस चौकशीत पोलिसांना सांगितले.

चाकू जप्त केला : आरोपी चेतन गालाचे मानसिक संतुलन बिघडलेले नसून तो मानसिक दृष्ट्या ठीकठाक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी हल्ला करण्यासाठी वापरलेला बारा इंचाचा चाकू जप्त केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरोपी चेतन गाला हा नोकरी धंदा करत नाही. तो सतत घरीच असायचा कुटुंबीयांशी वारंवार त्याचे खटके उडत. चेतन गाला याचे गिरगाव येथे लेडीज गाऊन विक्रीचे दुकान होते. मात्र चाळीत असलेले दुकान डेव्हलपमेंटला गेल्यामुळे चेतन गालाचा व्यवसाय बंद झाला होता. त्यानंतर चाळीचा विकास झाल्यानंतर चेतन गाला याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गाळा देण्यात आला. तो गाळा सध्या भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. हा गाळा विकण्याबाबत कुटुंबीय आणि चेतन गाला यांच्यात अनेकदा वादविवाद होत असत.

कुटुंबीय विभक्त : आरोपी चेतनला हा गाळा विकायचा होता, तर कुटुंबीयांना हा गाळा विकायचा नव्हता. त्यामुळे शेवटी कंटाळलेले कुटुंबीय पत्नीसह दोन मुली आणि एक मुलगा हे शेजारच्या इमारतीत म्हणजेच पन्नालाल मेंशन या चाळीत राहणाऱ्या चेतन गालाच्या आई-वडिलांकडे राहण्यास गेले होते. हल्ल्याच्या दिवसापासून 50 दिवसांपूर्वीच कुटुंबीय विभक्त राहत होते. मात्र चेतन गाला यास दोन्ही वेळचे जेवण पत्नी मुलांमार्फत पाठवून देत होती. चेतनची 18 वर्षीय मुलगी ही जेनिल ब्रह्मभटकडे येत जात असे. चेतनच्या एका मुलीचे लग्न झाले असून दोन मुली, पत्नी आणि तीस वर्षीय मुलगा असा त्याचा परिवार आहे. चेतनने पोलीस चौकशीत 18 वर्षीय जेनिल हिला मारायचे नव्हते, अशी खंत व्यक्त केली आहे.

उपचारादरम्यान तिचा मृत्यु : ज्यावेळी दुसऱ्या मजल्यावर चेतन गाला याने जयेंद्रभाई मिस्त्री आणि इलाबेन जयेंद्रभाई मिस्त्री यांच्यावर चाकूने वार केले. त्यावेळी त्यांच्याच खाली राहणाऱ्या पहिल्या मजल्यावर स्नेहल आणि त्यांची मुलगी जेनिल ब्रह्मभट्ट या धावत वरती आल्या. त्यांच्यासोबत असलेली आणखी एक मुलगी मात्र घाबरून वरती आली नाही. म्हणून ती बचावली. हल्ल्यामध्ये पडलेल्या जेनिल ब्रह्मभट्ट या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिच्या मानेवर खोल घाव झाला. त्यावेळी मानेवरती होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी हात ठेवून स्वतः चाळीच्या खाली उतरली. टॅक्सी पकडून नायर रुग्णालयात आली. जेनेलने जीव वाचवण्यासाठी टॅक्सी पकडून नायर हॉस्पिटल गाठले. पण उपचारादरम्यान तिचा शेवट झाल्याने पार्वती मेन्शनमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोटावर सपासप चाकूने वार : जेनिलचा मृतदेह पार्वती मेन्शन येथील तिच्या राहत्या घरी आणण्यात आला. दुःखात गोष्ट म्हणजे ही, की तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिची आई मात्र रिलायन्स रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. जेनिलची आई स्नेहल ही रिलायन्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जेनिल ही केसी कॉलेजमध्ये सायन्स शाखेतून शिक्षण घेत असून पदवीच्या पहिल्या वर्षाला होती. तिच्या पोटावर सपासप चाकूने वार केल्यामुळे पोटातील आतड्या बाहेर आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू : त्याचप्रमाणे या हल्ल्यात बचावलेले प्रकाश वाघमारे यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी चेतन गाला याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांकडे तसेच चेतनकडे देखील धुनी भांडीची कामे करत होते. वाघमारे यांची तब्येत काल ठीक नसल्याने ते गॅलरीत झोपले होते. वाघमारे यांच्यावर देखील चाकू हल्ल्या करण्यासाठी चेतन गाला गेला होता. मात्र ज्यांच्याकडे तो धुनी भांडी करायचा, त्यांच्याच दाराबाहेरील गॅलरी झोपला होता. त्या घरातील महिला बाहेर आल्या. तो गरीब आहे त्याला सोडून द्या, त्याला मारू नका अशी विनवणी चेतन गालाकडे केली. त्यामुळे चेतनने वाघमारे यांच्यावरती जास्त वार केले नाही.

हेही वाचा : Nashik Crime: चॉपरने वार करून कंपनीच्या सीईओची निर्घृण हत्या; रिक्षा चालकाने दाखवली माणुसकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.