ETV Bharat / state

Mumbai Crime: बळजबरीने गाडी अडवून मारहाण करणाऱ्या ३ आरोपीला चार तासांमध्ये अटक - Arrested within Four Hours In Mumbai

बोरिवली पश्चिम येथील एक्वेरिया ब्रँड येथे भरधाव वेगाने गाडीवर आलेल्या तीन व्यक्तीने, आमिर रेहान हॅरिस यांची गाडी अडवून त्याला मारहाण केली होती. या ३ आरोपींना पोलिसांनी चार तासांच्या आत अटक केली आहे.

mumbai crime
३ आरोपीस चार तासांमध्ये अटक
author img

By

Published : Apr 3, 2023, 10:13 AM IST

मुंबई : एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळजबरीने गाडी अडवून मारहाण करणाऱ्या ३ आरोपीस चार तासांमध्ये अटक करण्यात आले आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. तर सुरज नाड (27) शेल्टीन डायस (29) आणि पुरुषोत्तम बडलानी (43) अशी आरोपींची नावे आहेत. अशी माहिती एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली.

मारहाणीबाबत माहिती दिली: 1 एप्रिलला बोरिवली पश्चिम येथील एक्वेरिया ब्रँड येथे राहणाऱ्या आमिर रेहान हॅरिस (19) वर्ष याने पोलीस ठाण्याला या मारहाणीबाबत माहिती दिली होती. आमिरने पोलिसांना सांगितले की, 31 मार्चला रात्री 12.30 ते 12.45 वाजताच्या दरम्यान मंडपेश्वर मेट्रो स्टेशनच्या खाली, गणपत पाटील नगर न्यू लिंक रोड बोरीवली पश्चिम या ठिकाणी फिर्यादी ह्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी उभी करून अटकाव केला होता.

आरोपींविरोध गुन्हा दाखल: पांढऱ्या रंगाची वॅगनार गाडी क्रमांक MH 03, BE 7508 मधील 3 अनोळखी व्यक्तीने संगनमत करून फिर्यादी ह्यांच्या ताब्यातील गाडी क्र.MH 47,BF 4395 हीस त्यांच्या ताब्यातील वाहनाने ओव्हरटेक करून निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने व बेदारकरपणे वाहन चालून फिर्यादी ह्यांच्या गाडीसमोर आडवी उभी करून अटकाव केला. तसेच त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात, भारतीय दंड संहितानुसार कलम 341, 323, 504, 506 (2) , 34 सह कलम 177 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तिघांनाही केले अटक: पोलीसांनी गुन्ह्यातील घटनास्थळी जावून सीसीटीव्ही फुटेजच्या सहय्याने 3 ही अनोळखी व्यक्तीने वापरलेले व्हॅगनार गाडी क्रमांक मिळवले. या गाडी क्रमांकाचा संपूर्ण माहिती RTO मार्फत मिळवून गुन्हे प्रकटीकरण ह्यांच्या मदतीने शोध घेतला. या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली. त्यांना गुन्ह्याच्या तपासकमी हजर राहण्यासाठी CRPC 41(1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली. नंतर चौकशीअंती तिघांनाही पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: Mumbai Crime हेव्ही डिपॉझिटच्या नावाने महिलेची साडेनऊ लाखाची फसवणूक तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.