मुंबई- राज्याच्या गृह विभागाकडून राज्यातील 29 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त तसेच अप्पर पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.
दीपक विठ्ठलराव घीरे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 औरंगाबाद शहर या ठिकाणी बदली करण्यात आली असून सागर नेताजी पाटील यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पुणे शहर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच शिवराज बापूसाहेब पाटील यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नवी मुंबई या ठिकाणी तर संग्रामसिंह निशाणदार यांची पोलीस उपायुक्त गुन्हे, नाशिक शहर या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर आनंद भोईटे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पिंपरी चिंचवड या ठिकाणी, राहुल उत्तम श्रीरामे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर या ठिकाणी, डॉक्टर दिपाली राजेंद्र घाटे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सोलापूर शहर या बदली करण्यात आली आहे. तसेच नम्रता पाटील यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर, चंद्रकांत वामन गवळी यांची अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव या ठिकाणी, राहुल अरविंदराव माकणीकर यांची अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तर संजय पाटील यांची अप्पर पोलीस अधीक्षक पालघर याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, प्रशांत बच्छाव अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, विक्रांत विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक जालना, विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर जिल्हा नांदेड, सुनील कृष्णा लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक बीड, चंद्रकांत खांडवी अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, मोनिका नंदकुमार राऊत अप्पर पोलीस अधीक्षक अकोला , दत्ताराम राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर सुनिता साळुंखे पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पोलीस, श्वेता खेडकर पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पोलीस नागपूर, राजू भुजबळ पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण अमरावती, श्रीकांत धिवरे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण विद्यालय जालना , पंकज डहाणे पोलीस अधीक्षक नियंत्रण कक्ष महाराष्ट्र राज्य , निलेश आष्टेकर पोलीस उपायुक्त पीएमआरडीए पुणे , अपर्णा सुधाकर गीते पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती , राहुल धर्मराज खाडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद , सदानंद वायसे-पाटील पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे अशा तब्बल 29 वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत.