ETV Bharat / state

तौक्ते वादळ - मुलुंड, दहिसर कोविड सेंटरमधील २५० रुग्णांना हलवले

author img

By

Published : May 15, 2021, 4:42 PM IST

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार असल्याने रुग्णांवर रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईमधील बीकेसी, मुलुंड, दहिसर कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आले आहेत. वादळ, वारा, पाऊस याचा या सेंटरवर काही परिणाम होणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता.

tauktae cyclone
tauktae cyclone

मुंबई - कोकण किनारपट्टीवर शनिवारपासून ‘तौक्ते’ चक्रीवादळ धडकणार आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार असून रुग्णांवर रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तात्पुरते उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला वादळाचा फटका असू शकतो. यामुळे या कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर कायमस्वरूपी सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवले जाणार आहे. आतापर्यंत मुलुंड कोविड सेंटरमधून १०० तर दहिसर कोविड सेंटर येथील १५० अशा एकूण २५० रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे.

रुग्णांना हलवण्याची पालिकेची तयारी -
कोकण किनारपट्टीवर शनिवारपासून तौक्ते चक्रीवादळ धडकणार असून १६ आणि १७ मे रोजी मुंबईच्या किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहणार आहेत. यातच काही ठिकाणी पाऊस आणि ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मुंबईत 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार असल्याने रुग्णांवर रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईमधील बीकेसी, मुलुंड, दहिसर कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आले आहेत. वादळ, वारा, पाऊस याचा या सेंटरवर काही परिणाम होणार नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, मागील वर्षी आलेल्या रुखी वादळादरम्यान वांद्रे बीकेसी येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर ठिकाणी हलवावे लागले होते. याचा अनुभव असल्याने महापालिकेने तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना पक्के बांधकाम असलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी हलवण्याची तयारी केली आहे.

२५० रुग्णांना हलवले -
मुंबईच्या मुलुंड जम्बो कोविड सेंटरमधील १००पेक्षा जास्त रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यास सुरूवात झाली आहे. या भागातील महापालिकेच्या एमटी अग्रवाल, राजावाडी, मुलंड मिठागर कोविड सेंटर, भाभा रुग्णालय या ठिकाणी या रुग्णांना हलवण्यात आले आहे. त्याबरोबर ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे अशा रुग्णांसाठी मुलुंड ऑक्ट्रॉय नाका येथील आयसीयू युनिटमध्ये हलवले जाणार आहे. दहिसर कोविड सेंटरमधील १५० रुग्णांना गोरेगांवच्या नेस्को येथील कोविड सेंटरमध्ये हलवले जात आहे. तसेच इतर ६० रुग्णांना आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने त्यांना बाजूच्या महापालिकेच्या रुग्णालयात हलवले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

झाडांची छाटणी -

कोविड बाधित रुग्णांना अधिक प्रभावी औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या जम्बो कोविड सेंटरच्या परिसरालगत असणा-या धोकादायक वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे. यानुसार भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि क्रुडास, एन. एस. सी. आय. डोम, एम. एम. आर. डी. ए., बीकेसी जम्बो, नेस्को जम्बो कोविड सेंटर, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग इत्यादी ठिकाणी असणा-या जम्बो कोविड केंद्रांलगतच्या ३८४ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे.

या ठिकाणी केले जाणार रुग्णांचे स्थानांतर -
गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचा अनुभव लक्षात घेऊन तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून वांद्रे-कुर्ला संकुल व दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांसह ३९५ रुग्णांचे स्थानांतरण हे महापालिकेच्या व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. हे स्थानांतरण प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारितील सेव्हन हिल्स रुग्णालय, नेस्को जम्बो कोविड सेंटर, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील सेंट जॉर्ज रुग्णालय येथे करण्यात येणार आहे.

वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता
वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीजप्रवाह खंडित करण्यात आला आहे. रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती सामग्री उपलब्ध करुन द्ययवी जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.