ETV Bharat / state

मुंबईतील 'फॉर्च्युन हॉटेल'च्या आगीवर नियंत्रण; २५ डॉक्टर बचावले - Hotel Fortune Fire Doctors Saved

मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनला रात्री आग लागली. या आगीवर मुंबई अग्निशमन दलाने रात्री 2.20 च्या सुमारास नियंत्रण मिळवले असून 25 जणांची आगीतून सुखरूप सुटका केली आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : May 28, 2020, 10:00 AM IST

मुंबई - मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनला रात्री आग लागली. या आगीवर मुंबई अग्निशमन दलाने रात्री 2.20 च्या सुमारास नियंत्रण मिळवले असून 25 जणांची आगीतून सुखरूप सुटका केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे जे.जे हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टर या हॉटेलमध्ये राहत होते. त्या सर्वांना हॉटेल ट्रायडंटमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

जेजे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांच्या राहण्याची सोय मरिन लाईन्समधील धोबी तलावाजवळ असलेल्या ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये करण्यात आली होती. हे हॉटेल मरिन स्ट्रीट क्रमांक 1 येथे आहे. रात्रीच्या वेळी फॉर्च्युन हॉटेलच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागली. काही वेळातच ही आग वेगाने चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच 5 फायर इंजिन आणि 4 वॉटर टँकरसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर फायर ब्रिगेडकडून आगीच्या कूलिंगचे काम करण्यात आले.

मुंबईतील 'फॉर्च्युन हॉटेल'च्या आगीवर नियंत्रण

आग हॉटेलमधील इलेक्ट्रिक वायरिंगला लागली होती. पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत इलेक्ट्रिक डक्टमधून आग पसरली, तसेच सर्वत्र धूर पसरल्याने आग विझवण्याच्या कामात व्यत्यय येत होता.

हॉटेलमध्ये जे.जे रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणारे निवासी डॉक्टर राहत होते. आग लागलेल्या इमारतीत हे डॉक्टर अडकले होते. त्या पैकी एकाला पहिल्या मजल्यावरून, तीन जणांना तिसऱ्या तर एकाला इमारतीच्या गच्चीवरून अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच हॉटेलमध्ये अडकलेल्या इतर 20 डॉक्टरांना अग्निशमन दलाच्या शिडीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 25 डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढून हॉटेल ट्रायडंटमध्ये हलवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.