मुंबई - मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे. बोरिवली ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये दुपारी साडे बाराच्या सुमारास योग प्रात्यक्षिके सादर केली. लोकलमध्ये उभे राहून अथवा जागेवर बसून योगाची आसने करण्याकरीता प्रवासी ही मोठ्या संख्येने सहभागी झाले. पश्चिम रेल्वेच्या सहकार्यामुळे एका योग पथकातील २४ सदस्यांनी योगदिनात सहभाग घेतला होता.
बोरिवली लोकल
संपूर्ण जगामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. राज्यांमध्ये विविध ठिकाणी योग दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. दरवर्षी योगदिनाच्या उत्साहात मुंबई लोकलमधील गर्दीतून जागा करत प्रवासी योगदिन साजरा केला. मात्र, गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासात मुभा दिलेली नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देण्यात आली आहे. यंदा, पश्चिम रेल्वेने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी एका योगा ग्रुपला अनुमती दिली होती. या योगा ग्रुपने आज सकाळी साडेबाराच्या बोरिवली लोकल ट्रेनमध्ये योगाची प्रात्यक्षिके सादर केली आहे. यात योग पथकातील २४ सदस्यांनी योगदिनात सहभाग घेतला होता.
हेही वाचा - राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे नवे २१ रुग्ण