मुंबई - बोगस पावत्या वापरुन 2350 कोटींपेक्षा जास्त रकमेचा जीएसटी घोटाळा केल्याप्रकरणी बुधवारी तीन जणांना अटक करण्यात आली. या व्यक्तींनी बोगस पावत्या वापरुन इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा केला होता. जीएसटी ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीची करप्रणाली असल्याने त्याद्वारे करचोरी होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र करदात्यांनी स्वत:ची शक्कल लढवून मोठा घोटाळा करत करातील इनपूट क्रेडिटचा घोटाळा केला.
फसवणूकीची रक्कम मोठी
तपासणीत, ब्लू सी कमोडिटीज (आता मेसर्स कर्झन इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड), ब्लू सी कमोडिटीजचे संचालक आणि थीम लाइट्सचे संचालक महेश किंजर यांनाही कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा कोणताही पुरवठा किंवा प्राप्ती न करता जारी केलेले आणि प्राप्त केलेल्या बोगस पावत्यांच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडिट पास करण्यात आले. या संस्थांनी अपात्र इनपुट टॅक्स क्रेडीटने 580.23 कोटी रुपयांचा फायदा करून घेतला होता. फसवणूकीची एकूण जीएसटी रक्कम रु. 1,159.99 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे.
खोटे इनव्हॉइस
दुसर्या कारवाईत, डीजीजीआय मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी उद्योग किरणचे संचालक दीपककुमार प्रजापती यांना अटक केली. कंपनीने खोटेपणाने एनडी उपयोगात आणल्याची माहिती दिली होती. तसेच खोट्या इनव्हॉइसच्या आधारे अपात्र आयटीसी पास केले होते. कोणतीही वस्तू किंवा सेवांची कोणतीही पावती किंवा पुरवठा न करता पुरवठा केला जात असल्याचे दाखवले.
हेही वाचा - ...म्हाणून ‘त्या‘ तिघांनी झाडाला गळफास घेत केली होती आत्महत्या, धक्कादायक उलगडा
हेही वाचा - '26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; अजूनही जखमा ताज्याच