- पंढरपूर -
वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली आषाढी यात्रा पंढरपुराने पाहिली आहे. तीच वारी आम्हाला परत पाहायला मिळाली पाहिजे. 'हे विठ्ठला कोरोनाची संकट लवकरात लवकर दूर कर आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे आषाढी वारी, वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली पंढरी पाहू दे' असे साकडे पांडुरंग चरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले आहे.
सविस्तर वाचा - - नवी दिल्ली - पेगासस स्पायवेअरवरून देशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून पेगासस स्पायवेअर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जागतिकस्तरावर भारताला अपमानित करण्याचा काही वर्गांकडून प्रोत्साह दिले जात आहे. त्याबाबत आम्ही सायंकाळी रिपोर्ट पाहिला आहे. विध्वंस करणाऱ्या कटाच्या माध्यमातून भारताचा विकास हा रुळावरून घसरणार नाही. पावसाळी अधिवेशन विकासाचा नवा मापदंड करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
सविस्तर वाचा - - मुंबई -
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा हा अडचणीत सापडला आहे. गुन्हेशाखेने पोर्नोग्राफिक फिल्मस आणि हे फिल्म काही अॅपमधून प्रदर्शित केल्याबद्दल त्याला अटक केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफिक फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलेने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह ११ आरोपींना अटक केली आहे.
सविस्तर वाचा... - मुंबई -
उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मात्र, याप्रकरणी दोन दिवसातच वाद सुरू झाले आहे. आरपीजी समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी या विमानतळाबाबत केलेल्या ट्विट केलेल्या एका व्हिडिओ वादंग निर्माण झाले आहे. फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेले आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिला.
सविस्तर वाचा... - कोल्हापूर - बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करवीर तालुक्यातील परिते येथे एका खोलीत गर्भ लिंग तपासणी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर कथित महिला डॉक्टर पसार झाली आहे. या छाप्यात पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. वरिष्ठ पोलिसांनी या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश कोल्हापूर पोलिसांना दिले आहेत.
सविस्तर वाचा... - नाशिक -
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हेच झारीतील शुक्राचार्य असून यांना डिसेंबर 2022 पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाही, असा गंभीर आरोप माजी उर्जामंत्री तथा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी महाविकास आघाडीतील झारीतील शुक्राचार्य हे अडसर ठरत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ओबीसी आरक्षणात केंद्राचा कोणताही संबंध येत नसून राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील हा विषय असल्याचे म्हणाले.
सविस्तर वाचा... - मुंबई -
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर गाठले होते. या प्रवासावरती मनसेने टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशीच गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे अशी प्रार्थना विठ्ठलाकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
सविस्तर वाचा... - ठाणे -
दुर्गा चाळ, गोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे भूस्खलन झाले आहे. यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना ठाणे (प) येथील कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळी आरडीएमसी, टीडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. यात 1 रेस्क्यू वाहन, 1 अग्निशमनाची गाडी, 2 रुग्णवाहिकेचा समावेश आहे.
सविस्तर वाचा... - नवी दिल्ली - आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेच्या कामाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ केला. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.तर राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यामुळे सुरुवातीला 12 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. मात्र, पुन्हा दुपारी एक वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाम स्थगित करण्यात आले आहे. इस्रायली स्पाइवेयर पेगाससच्या माध्यमातून राजकारणी, मंत्री, पत्रकार आणि काही प्रमुख लोकांवर पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते आनंद शर्मा यावेळी म्हणाले की, हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर तत्काळ चर्चा व्हायला हवी.
सविस्तर वाचा... - मुंबई -
मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे ऑक्सिजन प्लांट निविदेत घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला. आता या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहेत. तसेच या सर्व प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी केली असून त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा...
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - लाईव्ह न्यूज
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
20 जुलैच्या महत्वाच्या घडामोडी

Last Updated : Jul 20, 2021, 1:21 PM IST