मुंबई - आज राज्यात 2 हजार 171 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 15 हजार 524 वर पोहचला आहे. तर, आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 894 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.26 टक्के, तर मृत्यूदर 2.53 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प पुस्तकाचे आज प्रकाशन
43 हजार 393 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात आज 2 हजार 556 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 20 हजार 6 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 43 लाख 67 हजार 94 नमुन्यांपैकी 20 लाख 15 हजार 524 नमुने म्हणजेच, 14.03 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 159 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 43 हजार 393 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924, तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून होणार सुरू