ETV Bharat / state

मान्यताप्राप्त 2,165 शाळांना अनुदान मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मागील काही वर्षांपासून अनुदानास पात्र ठरलेल्या 2 हजार 165 शाळांना अनुदान देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केली.

School Education Minister Varsha Gaikwad
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
author img

By

Published : Oct 15, 2020, 8:03 AM IST

मुंबई- मागील काही वर्षांपासून अनुदानास पात्र ठरलेल्या 2 हजार 165 शाळांना अनुदान देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे खासगी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या 2 हजार 165 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मिळणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केली.

मान्यताप्राप्त शाळांना अनुदान मंजूर झाल्याची माहिती देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे 2 हजार 165 शाळांना 20 टक्के व याआधी 2 टक्के अनुदान घेणाऱ्या 2 हजार 417 शाळांना अतिरिक्त 20 टक्के अनुदान 1 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

याचा लाभ एकूण 43 हजार 112 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचे शिक्षक आमदारांनी स्वागत केले असून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक भारती आदी संघटनांनी सरकारचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.